Mahadayi save Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: सायकल रॅलीतून म्हादई रक्षणाचा नारा

विवेकानंद पर्यावरण फौज: मांडवी तीरावरील गावांमधून जनजागृती

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीवर कर्नाटक सरकार धरणे उभारून पाणी वळवत आहे. कर्नाटकाने जर हे साध्य केले तर गोव्याच्या लोकजीवनासहित वन्यजीव आणि वृक्षवेलींवर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.

तेव्हा सर्वांनी म्हादईच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी केले. विवेकानंद पर्यावरण जागृती फौजने आयोजिलेल्या सायकल रॅलीवेळी सायकलपटूंना संबोधित करताना वरील आवाहन केले. यावेळी सहभागी सायकलपटूंनी ‘म्हादई रक्षणाचा’ नारा दिला.

मांडवी नदीच्या तीरावरील गावांमधून ही रॅली पार पाडली. या रॅलीला पणजी सायकलिंग ग्रुप, स्कोप अँड बेंड या सायकिंग संघटनेसहित इतर सुमारे 60 सायकलपटूंनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. रॅलीची सुरुवात पणजीतील सांतीनेझ खाडीकडून सुरवात झाली. त्यानंतर रायबंदर, जुने गोवे, गवंडाळी, माशेल, आमोणा, विर्डी, साखळी, डिचोली, मये तलाव, चोडण येथून पणजी दिवजा सर्कल येथे समाप्त झाली.

या रॅलीदरम्यान जुने गोवे येथे लोकसभा खासदार श्रीपाद नाईक यांच्या निवासस्थानी भेटून म्हादई रक्षणाचे निवेदन सादर केले. माशेल येथे पर्यावरण कार्यकर्ते मधू गावकर यांनी रॅलीचे स्वागत केले. मये तलाव येथे पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर यांनी उपस्थित सायकलपटूंना मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र केरकर यांनी गोव्याच्या जलसंपदेचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी पौर्णिमा केरकर, शुभदा च्यारी यांच्यासह विवेकानंद पर्यावरण फौजेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT