goa cm pramod sawant and mgp leader sudin dhavalikar Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंतांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, मगोपचं आव्हान

गोव्यात मगोप किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचा सुदिन ढवळीकरांचा दावा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात प्रमोद सावंतांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असं खुलं आव्हान मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी दिलं आहे. त्यामुळे भाजपसमोर आता आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे. याआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मगोपची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाची तृणमूल काँग्रेससोबत युती आहे. त्यामुळे साहजिकच भाजपशी मगो-तृणमूलची युती हातमिळवणी करणं कठीण आहे. मात्र आता पहिल्यांदाच सुदिन ढवळीकरांनी प्रमोद सावंतांना मुख्यमंत्री होऊ न देण्याचं आव्हान दिल्याने भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं आहे.

दरम्यान काँग्रेसच्या (Congress) नेत्यांकडून सातत्याने सुदिन ढवळीकरांशी बोलणी सुरु आहेत. काँग्रेस नेते आणि कळंगुटमधील काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांनी सुदिन ढवळीकरांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. तसंच भाजपने लाथाडल्यामुळे मगोप भाजपसोबत (BJP) जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मगो-तृणमूलचे नेते बैठक घेणार असून कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला जाईल, असं सुदिन ढवळीकरांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT