MGP leader Pravin Arlekar claim deputy CM Babu Ajgaonkar on Mopa International Airport Dainik Gomantak
गोवा

तर मगो आंदोलन करणार,प्रवीण आर्लेकरांचा इशारा

मगो पक्ष लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी दिला.

दैनिक गोमन्तक

जमीनी अल्प किंमतीत सरकारने ताब्यात घेतल्या. त्या जमिनी आता खाजगी मोपा विमानतळ (Mopa International Airport)बांधकाम करणाऱ्या जीएमआला कंपनीच्या घशात घालण्याचे काम पेडणे मतदारासंघाचे आमदार तथा गोवा राज्याचे उपमुख्यमंञी बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) करीत आहेत. असा आरोप पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी केला आहे. (MGP leader Pravin Arlekar claim deputy CM Babu Ajgaonkar on Mopa International Airport)

धारगळ येथे घेण्यात आलेली गृहनिर्माण वसाहत उभारण्यासाठी सरकारने घेतलेली सुमारे 1.68 लाख चौरस मीटर जमिन ही मोपा विमानतळ बांधकाम कंपनी जीएमआरला 60 वर्षांच्या करारावर देण्यासाठी करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यात विशेष लक्ष घालून ही जमीन वाचवावी व गृहनिर्माण वसाहत उभारण्याची जमीन तशीच ठेवावी नाहीतर मगो पक्ष लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी दिला.

दोनखांब धारगळ येथे सरकारने काही वर्षापूर्वी सरकारी वसाहत उभारण्यासाठी सुमारे 1.68 लाख जागा घेतली होती. ही जागा खाजगी कंपनीला देण्याचा घातलेला घाट कळल्यावर त्या ठिकाणी जाऊन आर्लेकर तसेच मगोचे पेडणे मतदारसंघाने अध्यक्ष उमेश तळवणेकर , माजी आमदार परशुराम कोटकर , आणि मगोच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT