MGP Leader Rohan Harmalkar  Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Rohan Harmalkar Arrested: हरियाणाच्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा आरोप रोहन हरमलकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Pramod Yadav

MGP Leader Rohan Harmalkar Arrested

बार्देश: गोवा सोड अन्यथा जीवे मारु अशी धमकी देऊन मारहाण केल्या महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाचे नेते रोहन हरमलकर आणि दुर्गादास मोरजकर यांना हणजूण पोलिसांनी अटक केलीय. रोहन आणि दुर्गादास यांच्याविरोधात दहा ते बारा इतर व्यक्तींसोबत मिळून एका अनोळखी व्यक्तीला धमकी देऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी हडफडे येथे ही घटना उघडकीस आली.

सुरेंद्र भरत सिंह कुमार (वय ५१, रा. हिस्सार, हरियाणा) यांनी हणजूण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी रोहन हरमलकर आणि दुर्गादास मोरजकर आणि इतर व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 89(2), 191(2), 118, 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पैकी हरमलकर आणि मोरजकर यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हरमलकर आणि दुर्गादास मोरजकर यांनी अन्य दहा व्यक्तींसोबत मिळून सुरेंद्र भरत सिंह कुमार याना धमकी देत कानशिलात लगावली तसेच, लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच, गोवा सोड अन्यथा जीवे मारु अशी धमकी दिली.

सुरेंद्र भरत सिंह कुमार यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी हरमलकर आणि मोरजकर यांना अटक केली आहे. हणजूण पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

Goa Water Supply: '2047 पर्यंत आवश्यक पाण्याची तजवीज 2 वर्षांत करणार', जलसंपदा मंत्री शिरोडकरांचा दावा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT