meteorological department's forecast was true, rain in valpoi-Bicholim Dainik Gomantak
गोवा

हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा, वाळपई-डिचोलीत पाऊस

उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कत राहण्याची गरज

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढ होत असून उष्णता वाढली आहे. दरम्यान 20 मार्च रोजी भारतीय हवामान विभाग, पणजी यांनी ढगाळ वातावरणामुळे एक-दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. आता पुन्हा हवामान विभागाने चेतावणी दिली असून उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील (South Goa) किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कत राहण्याची गरज आहे. दरम्यान, आज वाळपई, डिचोलीत (Bicholim) चांगलाच पाऊस झाला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाच्या पणजी वेध शाळेने उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यात पुढील 3-4 तासांत हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यताही वर्तविली आहे. हलका ते मध्यम पाऊससह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट ही होऊ शकतो असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या पणजी वेध शाळेने पावसाची शक्यता वर्तविताना नागरिकांना चेतावणी देत उत्तर गोव्यासह (North Goa) दक्षिण गोवा जिल्ह्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता ही वर्तविली आहे. त्यामुळे उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कत राहण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT