Vedanta New Company In Goa 
गोवा

Vedanta New Company: वेदांताच्या अनिल अग्रवाल यांची गोव्यात नवी कंपनी, कोणत्या क्षेत्रात करणार काम?

धातू आणि खाण क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली आहे.

Pramod Yadav

Vedanta New Company In Goa: धातू आणि खाण क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. सेसा आयर्न अँड स्टील लिमिटेड असे या नव्या कंपनीचे नाव असून गोव्यात त्याची नोंदणी करण्यात आली आहे. ही कंपनी वेदांत लिमिटेडची उपकंपनी म्हणून काम करणार आहे.

शेअर बाजारांत देखील या नव्या कंपनीची माहिती वेदांत लिमिटेडने दिली आहे. ग्रोथ प्रोजेक्टसाठी सेसा आयर्न अँड स्टील लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. नवीन कंपनी कामकाजाचा विस्तार करेल.

दरम्यान, वेदांताची Sesa Goa Iron Ore नावाची उपकंपनी गोव्यात आधीपासूनच कार्यरत आहे. कंपनी लोहखनिजाचे उत्खनन, खाणकाम आणि प्रक्रिया यात कार्यरत आहे. नवी कंपनी गोव्यातील वेदांताचा लोखंड आणि पोलाद व्यवसायात सक्रिय असेल, अशी माहिती आहे.

लोखंड आणि पोलादासाठी लोह खनिज हा सर्वात महत्वाचा कच्चा माल आहे. वेदांत रिसोर्सेसचे मुख्यालय लंडनमध्ये असून ही कंपनी भारतासह अनेक देशांमध्ये धातू आणि खाण व्यवसाय करत आहे. भारतातील संपूर्ण व्यवसाय वेदांत लिमिटेडच्या माध्यमातून चालवला जातो.

यापूर्वी वेदांत रिसोर्सेस आणि झांबिया सरकारमध्ये वाद झाला होता. वाद मिटवण्यासाठी, वेदांत रिसोर्सेसने झांबियातील खाणकामात 1 अब्ज डॉलर गुंतवण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनी २००४ पासून कोनकोला कॉपर माईन्ससोबत कमिटेड असून, पोर्टफोलिओचा एक प्रमुख भाग आहे. असे कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

वेदांत रिसोर्सेस आर्थिक अडचणींचा सामना करत असताना हा विकास झाला आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे वेदांत रिसोर्सेस नवीन कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीची स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी 1.3 अब्ज डॉलर कर्जासाठी बोलणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT