Russian Tourist Saves Bulls Dainik Gomantak
गोवा

Russian Tourist : रशियन महिला पर्यटकांची भूतदया; जखमी बैलांना वाचवले

‘ध्‍यान फाउंडेशन’च्‍या सहकार्याने शिरवई गोशाळेत उपचार

दैनिक गोमन्तक

काणकोण : मुक्‍या प्राण्‍यांच्‍या रक्षणासाठी ध्‍यान फाऊंडेशन राज्‍यात भरीव कार्य करत आहे. अलीकडेच दक्षिण गोव्यातील मेरियाम व ज्‍युली नावाच्‍या फ्रेंच महिला पर्यटकांनी ध्यान फाउंडेशनच्या मदतीने जखमी बैलांना वाचवण्यास मदत केली. (Russian Tourist Saves Bulls)

तळपण येथे एक बैल जखमी अवस्‍थेत आहे, असा एक कॉल मेरियाम हिने बुधवारी ‘ध्‍यान’च्‍या हेल्‍पलाईनवर केला. बैलाला एक खोल जखम होती. अवस्‍था एकदम नाजूक होती. ध्यान फाउंडेशनची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि बैलाची सुटका करून उपचार करण्यासाठी शिरवई येथील गोशाळेत नेण्‍यात आले.

मेरियाम ही महिला सकाळी 8 वाजता घटनास्थळी ध्यान फाउंडेशनच्या प्राणी रुग्णवाहिकेची वाट पाहत होती आणि बैलाची पूर्ण सुटका होईपर्यंत थांबली.

त्याचप्रमाणे 13 जानेवारीला ज्युली या फ्रेंच महिला पर्यटकाने आगोंद समुद्रकिनाऱ्यावर आणखी एक बैल लंगडत असल्याचे पाहिले. या महिलेनेही भूतदया दाखवत ध्यान फाउंडेशन अॅनिमल-हेल्पलाइनची मदत घेतली. बैलाला पुढील उपचारांसाठी शिरवई गोशाळेत नेण्यात आले. तेथे सुयोग्‍य उपचार झाले.

हजारो गुरांचे पुनर्वसन

ध्यान फाउंडेशन 2013 पासून गोवाभर बेघर, जखमी आणि आजारी प्राण्यांवर उपचार करून त्यांची काळजी घेत आहे. ध्यान फाऊंडेशनच्या बेतुल, शिरवई आणि जांबावली येथे गोशाळा असून, त्यामध्ये हजारहून अधिक गुरांचे पुनर्वसन करण्‍यात आले आहे.

‘ध्यान फाऊंडेशन’ खूप चांगले काम करत आहे आणि त्यांना पाठिंबा द्यायला हवा. तसेच गोव्यात वाहनचालकांनी लक्षपूर्वक वाहन चालवावे, जेणेकरून गुरांचा बचाव करता येईल.

- ज्‍युली, रशियन पर्यटक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

SCROLL FOR NEXT