Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : माता न तू वैरिणी; मानसिक तोल गेल्याने आईनेच घेतला चिमुकल्‍याचा जीव

ओयतियान-ताळगाव येथे आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा आईने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : ओयतियान-ताळगाव येथे आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा आईने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनीता राणी (वय-25, रा.मुळ नेपाळ) हिला अटक केली आहे. या प्रकरणात तिच्या मित्राचाही पोलिस शोध घेत आहेत.

सुनिताचा पती रेशम डांगी हा तिच्यासोबत राहात नाही. आपला पाच वर्षीय मुलगा आजारी होता आणि शनिवारी (29 ऑक्टोबर) अचानक त्याचा मृत्यू झाला, असे असा कांगावा करून तिने त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. याची कुणकूण पोलिसांना लागताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवचिकित्सा अहवाल आल्यावर त्या मुलाचा दोरीने गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

कारण गुलदस्त्यात

सुनिताचा एक मित्र असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. मात्र, मुलाचा तिने खून का केला हे तिने अजून सांगितलेले नाही.ही महिला मूळ दान नेपाळ येथील रहिवासी असून तिच्या कुटुंबियांना संपर्क केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तिला मनोरुग्ण इस्पितळात नेले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT