Melawali IIT Dainik gomantak
गोवा

गोवा सरकारकडून दिशाभूल; ‘आयआयटी’ आंदोलन पुन्‍हा पेटणार

लोकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारने आम्हाला अकारण खोट्या प्रकरणात अडकविल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात गाजलेल्या मेळावली ‘आयआयटी’ संस्था विरोधी आंदोलनाची (Movement) धग आजही कायम आहे. या आंदोलनात उतरलेल्या लोकांवर सरकारने सतरा गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यात मुख्यत्वेकरुन कलम 307 लावण्यात आले आहे. त्यामुळे मेळावलीतील ‘आयआयटी’ (IIT) संस्था रद्द केली, तरीही, लोकांना न्यायालयाच्या (Court) पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. सरकारने लोकांवर दाखल केलेले गुन्‍हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे मेळावलीवासीयांचे जीणे अवघड बनले आहे.

लोकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारने आम्हाला अकारण खोट्या प्रकरणात अडकविल्याचा दावा केला आहे.

गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली गावात ‘आयआयटी’ संस्था नियोजित होती. ऑगस्‍ट 2019 पासून हे प्रकरण गाजत होते. मेळावली भागातील तेरा लाख चौरस मीटर जागेत आयआयटी संकुल बांधले जाणार होते. पण, लोकांनी या संस्थेला मेळावलीत तीव्र आक्षेप घेतला होता. कारण, लोकांच्या या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. लोकांच्या काजू, सुपारी बागायती पिके संस्थेमुळे लोकांच्‍या कसवत्‍या जमिनी जाणार होत्या. म्हणूनच मेळावली भागातील सर्व लोकांनी एकजूट दाखवून अगदी लहानापासून वृद्धांपर्यंतच्या लोकांनी अगदी पोटतिडकीने आंदोलनात उडी घेतली होती. यात युवा शक्ती महत्त्‍वाची ठरली होती. युवा वर्गाने आपल्या अस्तित्वासाठी प्रखरपणे सहभाग घेतला होता. पण, आता युवकांवरदेखील खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

जमीन आयआयटीची कशी?

सरकारने मेळावली गावातून आयआयटी शिक्षण संस्था रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा. पण अजूनही मेळावलीची जमीन आयआयटीच्या नावावर आहे. ती सरकारने (Government) ताब्यात का घेतली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच लोकांवर खोटे गुन्‍हे सरकारने लादले आहेत. ते मागे का घेतले नाहीत, याचे उत्तर दिले पाहिजे. त्यावेळी सरकार लोकप्रतिनिधी सांगत होते की आम्ही लोकांसोबत आहोत. मग वरील गोष्टी अजूनही सोडविल्या नाहीत, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे. सरकारने जर लोकांच्या मागण्या त्‍वरित पूर्ण केल्या नाहीत, तर येत्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा लोकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT