Mega Housing Project Dainik Gomantak
गोवा

Mega Housing Project : मेगा हाउसिंग प्रकल्पाला विरोध; चर्चेवेळी बाचाबाची

Mega Housing Project : सांकवाळ पंचायतीमधील बैठक बारगळली,

गोमन्तक डिजिटल टीम

Mega Housing Project :

कुठ्ठाळी, सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावरफोंड येथे होऊ घातलेल्‍या मेगा हाऊसिंग प्रकल्पाला आज सकाळी पंचायत मंडळाच्या बैठकीत अधिकृत मान्‍यता देण्‍यात येणार होती.

परंतु सरपंच रोहिणी तोरस्कर, उपसरपंच गिरीश पिल्ले व पंचायत सचिव वालीस हे दोनदा उठून गेल्याने बैठक पूर्ण होऊ शकली नाही. त्‍यामुळे प्रकल्‍पाला मंजुरी मिळू शकलेली नाही. यावेळी सत्ताधारी पंच, विरोधातील पंच व ग्रामस्थांमध्ये शाब्‍दिक बाचाबाची झाली.

बैठक सुरू होताच सुकोरीना वालीस व विरोधी गटातील पंच मावरेलियो कार्वालो यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाले. हेच निमित्त पुढे करून सरपंच व उपसपंच हे सचिवांसह उठून गेले. परंतु, उपस्थितांनी गोंधळ माजवल्याने तसेच बैठक सुरू करण्याचा आग्रह धरल्याने ते परत आसनस्थ झाले.

यावेळी उपसरपंच गिरीश पिल्ले म्हणाले, आम्ही नाहक अपमान सहन करणार नाही. विरोधी गटातील पंच तुळशीदास नाईक म्हणाले, पंचायत सचिव बैठकीची नोंदवही घेऊन बाहेर जाऊ शकत नाहीत. यावेळी प्रश्‍‍नांची सरबत्ती झाली.

दरम्‍यान, कोणत्‍याही परिस्‍थितीत मेगा प्रकल्‍प होऊ द्यायचा नाही, असा ग्रामस्‍थांनी पवित्रा घेतला. या संदर्भात पुढील दिवसांत दिशा ठरवली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT