CM Pramod Sawant at IPB meeting Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सहा प्रकल्प मंजूर; 310 कोटींची गुंतवणूक, 2,500 युवकांना मिळणार रोजगार संधी

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्याच्या उद्योग आणि औद्योगिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नवीन 6 प्रकल्पांना गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने (आयपीबी) मंजुरी दिली आहे.

याविषयीची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ‘आयपीबी’ मंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. (CM Pramod Sawant on Investment in Employement Generation In Goa)

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. त्यासाठीच गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाच्या वतीने आजच्या बैठकीत सरकारकडे आलेल्या सातपैकी सहा प्रकल्पांना मंजुरी दिली. 310 कोटींची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पांमधून सुमारे 2,505 युवकांना रोजगार संधी उपलब्ध होतील.

पर्यटनवाढीसाठी ठोस नियोजन : मंत्री माविन गुदिन्हो

बैठकीमध्ये सरकारच्या लॉजिस्टिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली. मोपा विमानतळाजवळील थीमपार्कसाठी पुण्यातील ब्रह्माकॉर्प कंपनीच्या प्रकल्पाला मान्‍यता.

याशिवाय ब्ल्यूमाँक वेंचर डिस्टिलरी, समुद्राच्या पाण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिंपल्याच्या शेतीसाठी मदर ओशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला परवानगी देण्‍यात आली.

हॉट मिक्सिंगसाठी बागकीय कन्स्ट्रक्शन आणि कराड प्रोजेक्ट, मोटर्स लिमिटेडला इलेक्ट्रिकल मोटर्स उत्पादन व पॅकेजिंग उद्योगासाठीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

मोपाजवळ उभारणी

उत्तर गोव्यात नव्याने सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे मनोरंजन आणि निवासी संकुलाचे थीम पार्क उभारण्यात येणार आहे. पुणे स्थित ब्रह्मकॉर्प ही कंपनी हा पार्क विकसित करणार असून यामध्ये मनोरंजनासाठीचे विविध प्रकार असतील

ज्याचा लाभ स्थानिकांसह पर्यटकांना होऊ शकतो. हा प्रकल्प पर्यटनाला प्रोत्साहन देणार आहे. शिवाय प्रदूषण विरहित आहे, म्हणून पहिल्याच टप्प्यात हा प्रकल्प आयपीबीकडून मंजूर करण्यात आला.

प्रदूषण विरहित उपक्रमांना प्राधान्‍य

सरकारच्या उद्योग धोरणानुसार राज्यात यापुढे केवळ प्रदूषण विरहित प्रकल्पना मंजुरी देण्यात येईल. राज्यात कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही. याची दक्षता घेण्यासाठीच अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे.

समुद्री प्रकल्पासाठी विदेशी तंत्रज्ञान

समुद्राच्या पाण्याचा उपयोग करून मोती, शिंपले पैदास करणारा प्रकल्प मदर ओशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सादर केला होता. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णतः समुद्रात राबविण्यात येणार असून याद्वारे रोजगार निर्मिती होईल तसेच पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT