GMC Medical Waste Issue  Dainik Gomantak
गोवा

Medical Waste Issue: GMC चा अनागोंदी कारभार; 'आरोग्य' खात्याचेच आरोग्य धोक्यात!

जीएमसीच्या मागील भागामध्ये वैद्यकीय कचरा; आरोग्यमंत्र्यांचे मात्र दुर्लक्ष

Kavya Powar

गोवा वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच या-ना त्या कारणामुळे चर्चेत असते. GMC चा कारभार पाहणारे आरोग्यमंत्री यांच्याकडे या खात्यासह अजून तीन खाती असल्यामुळे कुठेतरी आरोग्य खात्यातील गैरकारभार सुरू असल्याची कल्पना त्यांना नाही, असे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जीएमसीमध्ये 'सरप्राईज भेट' दिली असून अधिकाऱ्यांची चौकशी केली; आणि यानंतर चारच दिवसांमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की, जीएमसीच्या मागील भागामध्ये वैद्यकीय कचरा (Medical Waste) खुल्या जागेत टाकले असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

नगरनियोजन,वन खाते तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या कामांमध्ये व्यस्त असलेले मंत्री आरोग्य खात्याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वैद्यकीय कचऱ्यामुळे भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?

गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी फॅकल्टी (forensic medicine and toxicology faculty) शवागार विभागाच्या मागे, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. यामुळे gmcचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन विभागांची पाहणी केली होती. त्यांच्या निगराणीतही असे गैरप्रकार कसे घडू शकतात? असा सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित प्रकाराबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आरोग्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित प्रकाराबद्दल त्वरित कारवाईची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT