Smart city inspection Sandip Desai
गोवा

Panaji Smart city inspection : कंत्राटदार नमला...आठवड्याची दिली मुदत!

‘साबांखा’ मंत्र्यांंकडून कानउघाडणी : सांतिनेजमधील कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

सांतिनेजमधील रखडलेल्या मलनिस्सारण वाहिनी टाकण्याच्या कामावरून गुरुवारी सार्वजनिक बांधकाम (साबांखा) मंत्री नीलेश काब्राल यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह स्मार्ट सिटी, जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन रखडलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी काम करणाऱ्या कंत्राटदाराने एक आठवड्यात ते काम पूर्ण करू, उपस्थितांना असे आश्‍वासन दिले.

सांतिनेज येथील मलनिस्सारण वाहिनीचे काम काही दिवस बंद राहिल्याने येथील नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. त्याशिवाय उत्पल पर्रीकर यांनी आमदार आणि महापौर व नगरसेवकांना चांगल्याच कानपिचक्याही दिल्या होत्या.

या सर्व कारणांमुळे गुरुवारी मंत्री काब्राल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा परिणाम आज दिसून आला. कंत्राटदार कंपनीच्या प्रमुखास बोलावून हे काम कधी पूर्ण होणार याची विचारणा करण्यात आली. त्यावर सात दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे त्याने आश्‍वासन दिले आहे. त्या आश्‍वासनानुसारच आता सांतिनेजमधील समस्या सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

परिसरात दुर्गंधी

सांतिनेजमधून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे मुख्य वाहिनी नेली जात आहे. ही वाहिनी टाकताना सांडपाण्याच्या जुन्या वाहिनीला तडा गेला आहे. त्यामुळे सांडपाणी चेंबरमध्‍येच राहून ते नव्या चेंबरसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यातही येऊन तुंबून राहिले आहे. त्याशिवाय सांडपाणी गटारातून रस्त्यावर वाहून येत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: शापोरात बेकायदेशीर रेती उत्खनन, आगरवाडा जैवविविधता मंडळामार्फत तक्रार दाखल

Morjim: ऐनवेळी 'अभंग वारी'ला ब्रेक! प्रशासनाच्या निर्णयामुळे तुये-पार्सेत रसिकांचा हिरमोड

Goa Weather: थंडीचा मुक्काम वाढला! गोव्यात किमान तापमानात मोठी घट, पहाटे अनुभवायला मिळतोय काश्मीरचा फील

'पार्टनर'च्या आजारपणामुळे हवा व्हिसा, रशियन महिलेच्या अर्जावर निर्णय घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात बांबोळी, नावशीही; किनारपट्टी भागातील गावांचा वाढतोय पाठिंबा, चिंबलमध्ये एकजूट

SCROLL FOR NEXT