Mayem Stray Cattle Issue Dainik Gomantak
गोवा

Mayem: मये परिसरात मोकाट गुरांचा उपद्रव वाठला, पंचायतीने त्वरित समस्या सोडविण्याची ग्रामस्थांची मागणी

Mayem Stray Cattle Issue: मये परिसरात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

Sameer Amunekar

डिचोली: मये परिसरात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत मयेत दाम्पत्यासह तिघांवर गुरांनी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. ही समस्या पंचायतीने त्वरित सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

रस्त्यावरील मोकाट गुरांविरोधात मोहीम हाती घेण्याचा निर्णय मये पंचायतीने घेतला असला, तरी अद्याप प्रत्यक्ष कारवाई सुरू झालेली नाही. मोकाट गुरांविरोधात कारवाई कधी? असा प्रश्न वाहनचालकांसह नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या मये पंचायतीच्या ग्रामसभेत मोकाट गुरांचा मुद्दा चर्चेत आला होता.

त्यावेळी शेतकऱ्यांनी गुरे रस्त्यावर सोडल्यास या मोकाट गुरांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरपंच सीमा आरोंदेकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र सहा महिने उलटलेत, तरी अद्याप कारवाई सुरू झालेली नाही की ही समस्या सुटलेली नाही.

मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केळबायवाडा ते हळदणवाडीपर्यंतच्या रस्त्यावर तर मोकाट गुरे सदैव रस्त्यावर संचार करताना आढळून येतात. गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

बऱ्याचदा ही गुरे रस्त्यावर ठाण मांडलेली आढळून येतात. रात्रीच्यावेळी तर रस्त्यावरील या गुरांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. वाहने हाकताना वाहनचालकांना तर अक्षरशः कसरत करावी लागते. गुरांमुळे अपघातांनाही निमंत्रण ठरत आहे. गुरांमुळे लहानसहान अपघातही घडत असतात.

गुरांकडून हल्ला

रस्त्यावरील गुरांकडून हल्ला करण्याचे प्रकारही घडत आहेत. केळबायवाडा येथे गुरांनी केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले होते. शिरोडकर दाम्पत्य स्कुटरवरुन डिचोलीच्या दिशेने जात होते. केळबायवाडा येथे चढणीवर पोचताच रस्त्यावरील गुरांनी स्कुटरला धडक दिली. त्यात शिरोडकर नवरा-बायको स्कूटरसह रस्त्यावर पडून जखमी झाले होते.

तर तीन वर्षांपूर्वी केळबायवाडा येथे गुरांनी केलेल्या हल्ल्यात तेथीलच एका हॉटेलमालकाचे दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. आणखीनही काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थ करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT