Mayem
Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem News : मये महामाया हायस्कूलच्या कार्यशाळांना प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News :

मये, श्री महामाया हायस्कूल मये येथे सम्राट क्लब मयेतर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला, रांगोळी कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळांना मुलांचा चांगला प्रतिसाद लाभला. चित्रकला कार्यशाळेला सम्राट श्रीहर्ष बोरकर व सम्राट हर्षा कठवणकर यांनी मार्गदर्शन केले.

तसेच मोनाली आरोंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापसापासून हार बनविणे व कागदांपासून फुले बनविणे ही कार्यशाळा घेण्यात आली. तसेच रांगोळी कार्यशाळेला मुकुंद मालगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष अर्जुन नाईक व त्यांचे सहकारी श्री महामाया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करत असतात.

मुलांनी या कार्यशाळेचा व्यवस्थित उपयोग करून घ्यावा, भविष्यात सफल व्हावे, असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा गोवेकर यांनी केले.

आजचे युग स्पर्धात्मक आहे, प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा, असे सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष व पीटीएचे अध्यक्ष अर्जुन नाईक म्हणाले. तसेच श्री महामाया हायस्कूलचे अध्यक्ष सागर ठाणेकर व संस्थापक जितेंद्र पत्रे यांनी सम्राट क्लब मये व कार्यशाळेला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेला ज्ञानेश्वर बोरकर, जयेश गावकर, शिल्पा पेडणेकर व विभा घाटवळ उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT