Mayem Redyachi Jatra, Vhadali Jatra Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem Redyachi Jatra: मयेची ‘रेड्याची’ जत्रा उत्साहात; मात्र तरंगांची परंपरा झाली खंडित

Vhadali Jatra Mayem: ‘माल्या’च्या जत्रेपाठोपाठ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मये येथील प्रसिद्ध ‘रेड्या’ची अर्थातच व्हडली जत्रा उत्साहात साजरी झाली.

Sameer Panditrao

डिचोली: ‘माल्या’च्या जत्रेपाठोपाठ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मये येथील प्रसिद्ध ‘रेड्या’ची अर्थातच व्हडली जत्रा उत्साहात साजरी झाली. या जत्रेलाही ‘माले’ पेटविण्याची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे ते पेटविण्‍यात आले. माशेलमधील देवतांच्या तरंगांनी यंदा जात्रेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे जत्रेतील तरंगांची प्रथा खंडित झाली.

तरी देखील अन्य पारंपरिक विधी पार पाडून मयेवासीयांनी ‘रेड्या’ची जत्रा परंपरेप्रमाणे साजरी केली. काल मध्यरात्री सुरू झालेल्या या जत्रेची आज सोमवारी पहाटे हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता झाली. या जत्रेला मोठा इतिहास आहे.

माशेल येथील श्री देवकीकृष्ण, श्री पिसो रवळनाथ आणि श्री कुलपुरुष या तरंगांशी ही जत्रा संबंधित आहे. दरम्‍यान, जत्रेनिमित्त दुकानांची मोठी फेरीही भरली होती. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्‍‍न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

बोलावणे करूनही आली नाहीत तरंगे

‘रेड्या’च्या जत्रेनिमित्त परंपरेप्रमाणे माशेलहून श्री देवकीकृष्ण, श्री पिसो रवळनाथ आणि श्री कुलपुरुष देवतांची तरंगे जलमार्गे होडीतून मये गावात येतात. ही तरंगे काल रविवारी सायंकाळी जलमार्गे मये गावात आली होती. पाटो-हळदणवाडी येथे पारंपरिक ठिकाणी ही तरंगे ठेवण्यात आली होती. मध्यरात्री बोलावणे करूनही ही तरंगे गावकरवाडा येथे आली नाहीत. अखेर मध्यरात्री ग्रामस्थ भाविकांनी श्री केळबाय देवीची पेठ सजवली. पेठ आणि पेटते ‘माले’ वाजतगाजत केळबायवाडा येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी ‘अवसारी’ मोडाने पेटते माले डोक्यावर घेऊन नृत्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

World Cup 2026 Final: फायनलचा फिव्हर! 6 हजारांची रूम थेट 80 हजारांना; अहमदाबादमध्ये हॉटेल्सचे अन् विमान तिकिटांचे दर गगनाला

VIDEO: वस्तीत घुसला बिबट्या, घरांच्या आसपास बिनधास्त वावर; गोवा - चांदोरमधील थरार पहा..

SCROLL FOR NEXT