Kudaneshwar Jatrotsav: ‘हर हर’च्या गजरात परिसर दणाणला! कुडणेश्वर देवाचा जत्रोत्सव उत्साहात; देवीचे होमकुंडातून मार्गक्रमण

Kudaneshwar Jatrotsav Kudnem Sanquelim: होमकुंडाला मंत्राग्नी दिल्यानंतर पहाटे सर्व धोंडगण व सातेरी देवीच्या कळसाने होमकुंडातून मार्गक्रमण केल्यानंतर मंडपात कौलोत्सव झाला व उत्सवाची सांगता झाली.
Kudaneshwar Jatrotsav Kudnem Sanquelim
Kudaneshwar Jatrotsav Kudnem SanquelimDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: कुडणे-साखळी येथील श्री देव कुडणेश्वराचा प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर कुडणे गावात या जत्रोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण होते. रात्री होमकुंडाला मंत्राग्नी दिल्यानंतर पहाटे सर्व धोंडगण व सातेरी देवीच्या कळसाने होमकुंडातून मार्गक्रमण केल्यानंतर मंदिराच्या मंडपात कौलोत्सव झाला व उत्सवाची सांगता झाली.

या जत्रोत्सवानिमित्त पहाटे ५.३० वाजल्यापासून मूर्तीस अभिषेक करण्यात आला. सायं. ४ वा. नवीन धोंडगणांना मानवून घेण्याच्या शास्त्राला सुरुवात करण्यात आली. ५ वा. श्री सातेरी देवीला बाल धोंडगणांसह ओटीचा मान अर्पण करण्यासाठी रवाना झाले. यावेळी बाल धोंडगणांनी ‘हर हर ’च्या गजरात परिसर दणाणून सोडला. त्यानंतर श्रींनी सातेरी देवीच्या मंदिराजवळ तळीवर स्नानासाठी प्रस्थान केले. यावेळी सुहासिनींतर्फे देवीची ओटी भरण्यात आली.

रात्री ११ वाजता हरवळे येथून श्री देव रुद्रेश्वराकडून देवाला भेट म्हणून आलेली ओटी, फुले व फळे स्वीकारण्यात आली. पहाटे धोंडगणांच्या साथीने व देवाच्या नामघोषात होमकुंडाला मंत्राग्नी देण्यात आल्यानंतर देवीने भक्तगणांसह स्नानासाठी तळीवर प्रस्थान केले.

होमकुंडातील लाकडे जळून निखारे तयार झाल्यानंतर ते निखारे एका बाजूने पसरवून थर निर्माण करण्यात आला. तोपर्यंत पहाटे ४ वाजले होते. यावेळी धोंडगणांनी श्री देव रवळनाथ व देवी महालक्ष्मीचा कृपाप्रसाद घेऊन धोडगणांंनी होमकुंडाच्या अग्निदिव्यातून मार्गक्रमणास सुरुवात केली. सकाळी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास देवीचा अग्निदिव्यातून प्रवेश झाला व नंतर मंडपात सर्वांसाठी कौलप्रसादचा कार्यक्रम झाला व जत्रोत्सवाची सांगता झाली.

Kudaneshwar Jatrotsav Kudnem Sanquelim
Lairai Jatrotsav: लईराईच्या जत्रेपूर्वी शिरगावातील रस्ते होणार चकाचक! 1.20 कोटी रुपये खर्चून हॉटमिक्स डांबरीकरण

‘गोबी मन्चुरियन’वर बंदी

जत्रोत्सवात देवस्थान समितीच्या निर्णयाप्रमाणे ‘गोबी मन्चुरियन’च्या दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. या दुकानांना थाटण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली नव्हती.

Kudaneshwar Jatrotsav Kudnem Sanquelim
Rudreshwar Rathotsav: भाविकांच्या अलोट गर्दीत रुद्रेश्वराच्या रथोत्सवाला प्रारंभ! 21 दिवस चालणार यात्रा

आज ‘सावता माळी’ नाटक

जत्रोत्सवानंतर श्री कुडणेश्वर मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी रात्री संगीत ‘जयंद्रथ विडंबन’ हे नाटक सादर करण्यात आले. शनिवार, १९ रोजी रात्री १०.३० वा. संगीत ‘सावता माळी’ हे नाटक सादर होणार. रविवारी (ता.२०) रात्री १०.३० वा. ‘फुक्या सोवाय’ हे नाटक सादर होणार आहे. सोमवारी (ता.२१) रात्री १० वा. ऑर्केस्ट्रा सादर केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com