mayem lake goa kayaking Dainik Gomantak
गोवा

Mayem Lake: मये तलावावर आता 'कायाकिंग'ची मजा; निसर्गाच्या कुशीत जलविहाराचा आनंद

mayem lake goa kayaking: समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात अन्य अनेक पर्यटनस्थळे असून, या पर्यटनस्थळांना नवसंजीवनी आणि पर्यटनाला चालना मिळण्याची गरज आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात अन्य अनेक पर्यटनस्थळे असून, या पर्यटनस्थळांना नवसंजीवनी आणि पर्यटनाला चालना मिळण्याची गरज आहे. ‘गोवा बियोंड बीच’ संकल्पनेंतर्गत राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा भर आहे, असे प्रतिपादन खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले.

जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या मये तलावावर ''कायाकींग'' बोटिंग सुविधेच्या शुभारंभप्रसंगी खासदार तानावडे प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. पर्यटनाचा आस्वाद लुटण्यासाठी पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजीही तेवढीच महत्वाची आहे, असेही तानावडे म्हणाले. आमदार केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, कुंदा मांद्रेकर, कुलदीप आरोलकर, पुनम रिबो आदी उपस्थित होते.

खासदार, आमदार सहभागी!

सदानंद शेट तानावडे यांनी फीत कापून कायाकींग बोटिंग सेवेचा शुभारंभ केला. त्यांच्यासह प्रेमेंद्र शेट आणि केदार नाईक यांनी कायाकींग बोटिंगचा आनंद लुटला. पर्यटनखात्याच्या सहकार्याने पर्यटन महामंडळाचे उपव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. कोकण एक्स्पलोअर्सतर्फे ही ''कायाकींग बोटिंग'' सेवा सुरु केली आहे. यावेळी ग्रामस्थ, पर्यटक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT