Goa University: विद्यापीठात भाषा विभागांकडे विद्यार्थ्यांचा ओढा; कोकणीत 30, मराठीत 19 विद्यार्थ्यांची नोंदणी; साहित्य-संशोधन उपक्रमांना चालना

goa university language departments: गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून प्रवेश प्रक्रियेची प्रथम फेरी संपून आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे.
Goa University
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून प्रवेश प्रक्रियेची प्रथम फेरी संपून आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. येत्या १७ जूनपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात होणार असून कोकणी विभागात एम.ए.साठी ३० तर मराठी विभागात १९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दुसऱ्या प्रवेश फेरीनंतर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती विभागांकडून देण्यात आली. कोकणी आणि मराठी दोन्ही भाषांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण साहित्यिक विकासासाठी विभाग कार्य करत आहेत.

Goa University
Goa Congress: काँग्रेसच्या मनीषा, शमिला निलंबित; पक्षातर्फे कारवाई, पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका

गोवा विद्यापीठात कोकणी भाषेतील विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक असून या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमांसोबतच विविध साहित्यिक, संशोधनात्मक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. सासाय या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन येत्या २३ जून रोजी होणार आहे.

दरवर्षी कोकणी विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते परंतु यंदा अखिल गोवा युवा कोकणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कोकणी विभागाचे प्रा. प्रकाश पर्येकर यांनी सांगितले.

Goa University
Goa Accident Death: महाखाजन-धारगळ येथे भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला मागून धडक; एक दाम्‍पत्‍य ठार

लोकसाहित्यावर संशोधन!

मराठी विभागात साहित्यिक उपक्रमासोबतच सांस्कृतिक तसेच इतर विविधांगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्जनशील लेखनाला, संशोधनाला प्राधान्य देण्यात येते. आज मराठी विभागातील अनेक विद्यार्थी हे आवर्जून संशोधनाकडे वळत आहेत.

गोमंतकीय लोकसाहित्यावर चांगले संशोधन होत आहे. अभ्यास सहली,परिसंवाद आदीच्या माध्यमातून मराठी विभागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मराठी विभागाचे प्रा. विनय बापट यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com