Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem News : मयेतील प्रसिद्ध ‘रेड्या’ची जत्रा मंगळवारी ; भाविकांच्या आशा पल्लवीत

Mayem News : मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या दोन वर्षापासून मयेतील रेड्याची जत्रा साजरी झालेली नाही. त्यापूर्वी ''कोविड'' महामारीमुळे दोन वर्षे या जत्रेवर निर्बंध आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem News :

डिचोली, तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर यंदा मये येथील प्रसिद्ध ''रेड्या''ची जत्रा (व्हडली जत्रा) साजरी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मयेतील ''माल्या''ची जत्रा साजरी होवून ''माले'' पेटल्याने रेड्याची जत्रा साजरी होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जत्रेबाबतीत मयेवासीयांसह भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

श्री माया केळबाय पंचायतन देवस्थानची मंगळवारी (ता.२०) साजरी होणार आहे. कायदेशीर अडथळा निर्माण झाला नाही, तर ही जत्रा निर्विघ्नपणे साजरी होणार आहे.

...म्हणून मार्ग झाला मोकळा

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या दोन वर्षापासून मयेतील रेड्याची जत्रा साजरी झालेली नाही. त्यापूर्वी ''कोविड'' महामारीमुळे दोन वर्षे या जत्रेवर निर्बंध आले होते.

मयेतील ''माल्या''च्या जत्रेवरच रेड्याच्या जत्रेचे भवितव्य अवलंबून असते. तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर ''माल्या''ची जत्रा साजरी झाल्याने आता ''रेड्या''ची जत्रा साजरी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND Vs AUS: क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची अपडेट! भारत-ऑस्ट्रेलिया मालिका रंगणार; काय आहेत तारखा? जाणून घ्या..

Rishabh Pant: रिषभ पंतबाबत मोठी बातमी! 'या' क्रमांकावर करणार फलंदाजी; जबाबदार खेळी करण्याचे असणार आव्हान

Goa Politics: खरी कुजबुज; ...तर सुदिन, ‘मगो’बाबत वेगळा निर्णय

ISL 2026: 2 मिनिटे बाकी असताना गेलेला सामना बचावला! कर्णधार ठरला संकटमोचक; FC Goa चेन्नईयीन सामन्यात गोलबरोबरी

Ponda By Election: पक्षाचा आपण 'निष्ठावंत कार्यकर्ता'! विश्‍वनाथ दळवी करणार रितेश नाईक यांचा प्रचार; कार्यकर्त्यांच्या शंका दूर

SCROLL FOR NEXT