Hit And Run Case ai image generator
गोवा

Hit And Run Case: मयडेतील हिट-ॲण्‍ड-रनचा छडा; पादचाऱ्याला चिरडून पसार झालेल्‍या वाहनचालकाला अटक

Mapusa Hit And Run Case: मयडे येथील आत्ताफोंडे पुलाजवळ मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण हिट-अँड-रन प्रकरणाचा छडा लावण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: मयडे येथील आत्ताफोंडे पुलाजवळ मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण हिट-अँड-रन प्रकरणाचा छडा लावण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. पादचाऱ्याला चिरडून पसार झालेल्या कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला पोलिसांनी आज अटक केली. रोहन पाटील (३२, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. या अपघातात आंतोनिओ जॉनी क्वाद्रोस (३५, रा. मयडे) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

काल मंगळवारी पहाटे चार ते सहाच्या सुमारास आंतोनिओ हे रस्त्यावरून पायी जात असताना बस्तोडा येथून मयडेमार्गे हळदोण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले होते. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

हेड कॉन्स्टेबल केशव नाईक यांच्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्‍या २०२३ मधील कलम २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्‍वपूर्ण

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वाहनाचा शोध घेण्यात आला. संबंधित वाहन महाराष्ट्र नोंदणीचे असून ते कोंबडी वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रोहन पाटील याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT