Mayde Gram Panchayat Waste Management Dainik Gomantak
गोवा

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Private Waste Contractor Proposal Rejected: मयडे ग्रामपंचायतीतर्फे सध्या राबविण्यात येणारी कचरा व्यवस्थापन प्रणाली यापुढेही कायम ठेवण्याचा एकमुखी ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: मयडे ग्रामपंचायतीतर्फे सध्या राबविण्यात येणारी कचरा व्यवस्थापन प्रणाली यापुढेही कायम ठेवण्याचा एकमुखी ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या पॅनेलवर खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.

सरपंच सागर नाईक यांनी सांगितले की, पंचायत २०१६ पासून चार कर्मचाऱ्यांच्या मदतीने ओला व सुका कचरा यशस्वीपणे संकलित करत आहे. सध्याच्या व्यवस्थेवर दरमहा सुमारे १.५० लाख खर्च होत असून, खासगी कंत्राटदार नेमल्यास तो ३.५० लाखांपर्यंत वाढेल.

त्यामुळे ग्रामस्‍थांवर करवाढीचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता असल्याने त्‍यांनी विद्यमान व्यवस्थेलाच पसंती दिली. याशिवाय गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली.

‘अर्बन फ्रेम सर्व्हे’लाही विरोध

प्रस्तावित ‘अर्बन फ्रेम सर्व्हे’ या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. पंचायतीने यापूर्वीच गावाच्या शहरीकरणाला विरोध केल्याची माहिती देत, मयडेमध्ये असा सर्व्हे होऊ नये, अशी भूमिका सरपंचांनी स्पष्ट केली. मात्र, ग्रामस्थ आग्नेलो मेंडोसा आणि डॉ. ग्रेटा कॉस्टा यांनी केंद्र सरकारचा मूळ आदेश व सर्वेक्षणाचा उद्देश समजून घेण्याची गरज व्यक्त केली. त्यानुसार केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे आदेशाची प्रत आणि सविस्तर माहिती मागविण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT