mauvin godinho In valpoi  Dainik Gomantak
गोवा

Prashasan Tumchya Daari : सरकार नव्या ‘ई-बस’ खरेदी करणार : माविन गुदिन्हो

वाळपईत ‘प्रशासन तुमच्या दारी’मध्ये ग्वाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

ग्रामीण भागात लोकांना वाहतुकीची उत्तम सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक खात्याचा नवीन पाचशे ई-बसेस खरेदीचा प्रस्ताव ठेवणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीत अडीचशे बसेस देण्याचे निश्चित झाले असून पुढील महिन्यात शंभर बसेस राज्याला मिळतील, अशी ग्वाही वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशासन तुमच्या दारी उपक्रमात ते बोलत होते. मंत्री गुदिन्हो यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

तीस दिवसांत फाईल मार्गी लागेल !

पंचायतीत एखादी फाईल दिल्यानंतर ती पूर्णत्वास येण्यास बराच अवधी जातो. म्हणूनच आता नवीन नियम लागू करून तीस दिवसात फाईल मार्गी लागेल, तशी तरतूद केली जाणार आहे. पंचायत व गटविकास अधिकारी यांच्या संयोजनातून तीस तीस दिवसांत कामांची कार्यवाही होणार आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

"सत्तरीच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने योग्य व्यक्तीची नेमणूक केली आहे. सत्तरीत यापूर्वी मंत्री काब्राल ‘प्रशासन तुमच्या दारी’ उपक्रमात सामील झाले होते. आज गुदिन्हो यांनी समस्या सोडवण्याबाबत दिलेला प्रतिसाद चांगला आहे."

-डाॅ.दिव्या राणे,आमदार पर्ये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT