Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

'वीज बिल सवलत घोटाळ्यातून मुक्त करा'

5.54 कोटींच्या घोटाळाप्रकरणी मॉविन गुदिन्होंचा अर्ज; 23 मे रोजी युक्तिवाद

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : तब्बल 5.54 कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळ्यातून आपल्याला मुक्त करण्यात यावे असा अर्ज या प्रकरणातील प्रमुख संशयित असलेले वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो यांनी केला आहे. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात हा खटला चालू असून यात गुदिन्हो यांच्यासह सहा जणांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचा दावा करून आपल्याला या खटल्यातून वगळावे अशी विनंती त्यांच्या वतीने त्यांचे वकील अरुण ब्रास डीसा यांनी केला. या अर्जावर आता 23 मे रोजी युक्तिवाद होणार आहे.

काँग्रेस सरकारात गुदिन्हो हे विजमंत्री असताना काही कंपन्यांना त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने वीज बिलात सवलत देऊन राज्याचे 5.54 कोटींचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्याशिवाय त्यावेळचे वीज खात्याचे अभियंते आणि ज्या कंपन्यांना बिलात सवलत मिळाली त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी आरोपी केले आहेत.

दरम्यान या भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यापासून आपल्याला सवलत द्यावी यासाठी टी. नागराजन यांनी केलेल्या अर्जावरही 23 मे रोजी युक्तिवाद ठेवला आहे. आज गुरुवारी नागराजन यांच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT