Students in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Education : आता गोव्यातील विद्यार्थ्यांचे गणित सुधारणार

एएनएस सर्वेक्षण : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांंची शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Education : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणाच्या (एनएएस) पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांची विशेषतः गणित विषयातील कामगिरी सुधारण्याविषयी शिक्षण खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांकडेच शिक्षण खाते आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावी शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांचे सरासरी गुण राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्षण खात्‍याच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली.

एनएएसच्या निष्कर्षांनुसार, विशेषतः गणितात राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी ‘विद्यावृक्ष डॉट कॉम’चे सिद्धराज मोपकर यांनी या समस्येवर मात करण्यासाठी रोडमॅप सादर केला. प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा, प्रकल्प प्रदर्शन, गणित स्पर्धा परीक्षा यासह गणित महोत्सवाचे आयोजन करावे. राज्यातील शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण सुधारणा हा मंत्र असला पाहिजे, असे मोपकर म्हणाले.

बालपणीचे शिक्षणच महत्त्वाचे

सिद्धराज मोपकर यांनी सांगितले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्‍यांच्‍यात आत्मविश्वास निर्माण केला की ते अधिक चांगली कामगिरी करू शकतात. शिक्षणाचा पाया मजबूत व्‍हावा, यासाठी बालपणीचे शिक्षण अधिक मजबूत केले पाहिजेत. यात पालकांचाही सहभाग असावा. प्राथमिक पातळीवरच गणितात कच्चे राहिले तर भविष्यात त्‍याला अडचणींचा सामना करावा लागतो. पुढील शिक्षण घेत असताना अनेक कारणांमुळे त्‍यांचे गणित सुधारत नाही. बालपणीचे शिक्षणच पुढील आयुष्यातील कामगिरी ठरवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: साखळी रविद्र भवनात कृष्णबट्ट बांदकरांच्या तैलचित्राचे अनावरण

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT