Goa Cricket Team Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Team: गोव्याच्या क्रिकेटपटूंना मास्टर ब्लास्टर सचिनचे मार्गदर्शन

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सलग दुसऱ्या वर्षी गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे.

Kishor Petkar

Goa Cricket Team: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सलग दुसऱ्या वर्षी गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्या अनुषंगाने विक्रमवीर क्रिकेटपटूने शुक्रवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर उपस्थित लावली आणि गोव्याच्या रणजी, तसेच युवा वयोगटातील क्रिकेटपटूंना मौल्यवान मार्गदर्शन केले. गोव्याच्या संघासाठी तो एकप्रकारे ‘मेंटॉर’ ठरला.

सचिन मैदानावर येणार याची अगोदर कल्पना नव्हती, त्यामुळे तो मैदानावर येताच विशेषतः गोव्याच्या वयोगट क्रिकेट संघातील युवा क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्का बसला. सचिनने क्रिकेटपटूंसमवेत फोटोही काढले.

शिवाय नेटमध्ये सराव करणाऱ्या सीनियर संघाची कामगिरी पाहिली, खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. त्याने मैदानावरील उपस्थितीत गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन गावस देसाई, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; अबब! 50 कोटींचा खर्च वायफळ

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT