ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: राजकीय आरक्षणासाठी जनआंदोलन

फोंडा एसटी नेत्यांचा निर्धार ः निवडणुकीपूर्वी अधिसूचनेचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी ‘मिशन राजकीय आरक्षण’ फोंडा तालुका बैठक मंगळवारी झरेश्वर हॉल फोंडा येथे झाली. राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला एसटी समाजाचे सरपंच, उपसरपंच सदस्यांसह सुमारे 75 नेत्यांचा उदंड प्रतिसाद दिसून आला. या बैठकीला फोंडा तालुक्यातील एसटी संघटनांचे पंच सदस्य, माजी पंच, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

13 एप्रिल रोजी मडगाव येथे निवडून आलेल्या पंच, सरपंच आणि जिल्हा पंचायत सदस्यांसह 14 अनुसूचित जमाती संघटनांच्या सदस्यांची बैठक झाली होती आणि एसटी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक तालुक्यात गावपातळीवर जनजागृती सभा घेण्याचा संकल्प केला होता.

गोवा विधानसभेतील अनुसूचित जमातींच्या जागांच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना लोकसभा निवडणुकीपूर्वी जारी न केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला होता.

दरम्यान, गोवा गौड समाजाचे अध्यक्ष घनश्याम बोरकर यांनी नैतिक, कायदेशीर आणि तांत्रिक पाठबळ दिले. सचिव रूपेश वेळीप यांच्याकडे एसटीसाठी मिशन राजकीय आरक्षणाला समर्थन पत्र सुपूर्द केले. यासह आता या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या गोव्यातील एकूण एसटी संघटनाची संख्या 15 झाली आहे.

जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

गाकुवेधचे संस्थापक सदस्य कांता गावडे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या जनआंदोलनात सहभागी व्हावे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार आमची मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास आणखी एक जनआंदोलन करण्यास तयार राहावे, असे आवाहन केले.

फोंडा तालुक्यासाठी समिती : फोंडा तालुक्‍यासाठी 40 सदस्यांची तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली असून ती फोंडा तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती बैठका घेईल.

डॉ. ए. एस. सत्यवान गावकर यांची फोंडा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी नीलेश बी. गावडे आणि सचिवपदी देवानंद वेलिंगकर यांची एकमताने निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लाटले!

Anjuna Music Event Protest: हणजूणमध्ये संगीत महोत्सवावरून स्थानिकांमध्येच जुंपली; भर सभेत तरुणाला धक्काबुक्की; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

IFFI 2024: 'समृद्ध जीवनशैलीच्या नादात देश सोडू नका'; 'अमेरिकन वॉरियर्स'च्या निर्मात्या नेमक्या काय म्हणाल्या पाहा

SCROLL FOR NEXT