श्री सुसेनाश्रम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.  Dainik Gomantak
गोवा

इंडियन रेड क्रॉस सोसायटी मुरगाव शाखेने विविध शाळांना वाटले मास्क

म्युनिसिपल शाळेतील विद्यार्थी आणि बहुतांश सरकारी शाळांमध्ये आणि वास्कोच्या आसपास असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: इंडियन रेड क्रॉस सोसायटी (Indian Red Cross Society) मोरमुगाव शाखा वास्को(Vasco) दा गामा. कोविड-19 काळात बंद असलेल्या शाळा मोजकेच वर्ग सुरू करुन चालू करण्यात आले. त्यानुसार शाळा सामान्य वर्गाने सुरू झाल्यामुळे आणि या महामारीच्या काळात मास्क घालण्याचे महत्त्व लक्षात घेऊन इंडियन रेड क्रॉस सोसायटी - मुरगाव शाखेने मुरगाव मधील विविध शाळांना मास्क पॅकचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आज भारतीय रेड क्रॉस सोसायटी मुरगाव तालुका शाखेने तीन शाळांना (School) 1600 मास्कचे वाटप केले वाडे वास्को येथील मदर ऑफ मर्सेस इंग्लिश हायस्कूल , अंजुमन हिमायतुल इस्लाम हायस्कूल , श्री सुषेनाश्रम विद्यालय हायस्कूल. या शाळांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे मुखवटे वितरीत करण्यात आले. याव्यतिरीक्त म्युनिसिपल शाळेतील विद्यार्थी आणि बहुतांश सरकारी शाळांमध्ये (Government Schools) आणि वास्कोच्या आसपास असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या मुरगाव शाखेच्या अध्यक्षा फिओला रेगो (Fiola Rego) विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की, मास्क घालणे कीती महत्वाचे आहे याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क घालणे एकदम गरजेचे आहे.काही विद्यार्थी मास्कशिवाय येत असल्याने शाळेने त्यांच्यासाठी तरतूद केली पाहिजे असे फियोला रेगो यांनी सांगितले. भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या या उपक्रमाबद्दल शालेय अधिकारी (School officer) वर्ग खूप खुश झाले व त्यांनी भारतीय रेड क्रॉस सोसायटी आभार व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्षा डॉ.कीर्ती नाईक, सचिव जयमोल नाईक, अर्नाल्डो रेगो, विल्यम कार्डोज, लुईझा कार्डोझ आणि मदर ऑफ मर्सेस हायस्कूलचे अध्यक्ष श्री. जॉय डिसोझा, मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा तिरोडकर, अंजुमन हायच्या मुख्याध्यापक श्री.एम.पी.दाबोळकर आणि श्री सुसेनाश्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता एस. पवार आणि सर्व शाळांचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT