Goa: विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरगाव देवस्थाने व भटजी यांचा सन्मान

हिंदू समाजाला संघटित करून आपले हिंदुत्व टिकवून ठेवणे, इतकेच नव्हे तर आजच्या तरुण पिढीला आपल्या हिंदुत्वाची खरी जाण करून देणे गरजेचे आहे.
विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरगाव तालुक्यातील देवस्थान तसेच पुरोहित यांना श्री अंबाबाई मंदिरात सन्मानित करण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरगाव तालुक्यातील देवस्थान तसेच पुरोहित यांना श्री अंबाबाई मंदिरात सन्मानित करण्यात आले. Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: विश्व हिंदू (Vishwa Hindu) परिषदेतर्फे मुरगाव प्रखंडातील देवस्थाने (Temples) व भटजी यांचा सन्मान करण्यात आला. सदर सोहळा मांगुरहिल वास्को येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात पार पडला. गोकुळ अष्टमीच्या दिवशी विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनानुसार तालुक्यातील देवस्थानात गोकुळ पूजन करण्यात आले.

या दिवशी प्रत्येक मंदिरात विविध धार्मिक (Religious) विधी पार पाडल्या. या मागचा मुख्य हेतू म्हणजे हिंदू समाजाला संघटित करून आपले हिंदुत्व टिकवून ठेवणे, इतकेच नव्हे तर आजच्या तरुण पिढीला आपल्या हिंदुत्वाची खरी जाण करून देणे असाही यामागचा मुख्य हेतू होता. त्यानुसार तालुक्यातील विविध देवस्थानात पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने गोकुळ पूजनाचा कार्यक्रम विविध धार्मिक विधीनुसार पार पडला. प्रत्येक देवस्थान आणि तसेच या देवस्थानातील पुरोहितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल देवस्थानाला तसेच देवस्थानातील पुरोहितांना श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम नुकताच मांगुरहिल येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई (Shri Mahalakshmi Ambabai) मंदिरात पार पडला.

विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरगाव तालुक्यातील देवस्थान तसेच पुरोहित यांना श्री अंबाबाई मंदिरात सन्मानित करण्यात आले.
वर्षभरात पुर्ण होणार दाबोळी विमानतळाचे काम ; गगन मलिक

श्री शांतादुर्गा सत्यनारायण सांस्कृतिक संस्थान (केळशी कुठ्ठाळी), श्रीराम विश्वकर्मा संस्थान (मेस्तवाडा वास्को), श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण संस्थान (मुंडवेल वास्को), श्री दत्तवाडी संस्थान ( ओरूले वास्को), श्रीराम मंदिर सेवा समिती (वरुणापुरी वास्को), श्री लिंगेश्वर मठ (झुआरीनगर), श्री जय बजरंग बली संकटमोचन मंदिर (बायणा समुद्रकिनारा वास्को), श्री गजानन मंदिर ट्रस्ट (बोगदा वास्को), श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर (मांगुर वास्को), श्री महादेव पंचायतन देवस्थान (दाबोळी), श्री दुर्गादेवी मंदिर कमिटी ( झुआरीनगर साकवाळ), श्री दुर्गा माता मंदिर हाऊसिंग बोर्ड (नवेवाडे), श्री महारुद्र हनुमान संस्थान (नवेवाडे वास्को), श्री हनुमान देवस्थान ( झुआरीनगर साकवाळ), श्री हनुमान देवालय (सडा वास्को), श्री दामोदर राट्रोळी ईस्वटी ब्राह्मण देवस्थान (हार्बर मुरगाव), श्री इस्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण देवालय (सडा वास्को), श्री सिद्धिविनायक व्यंकटेश संस्कृती संस्थान (मांगुरहिल), श्री मांगिरीश कुशस्थळ ग्रामस्थ संस्थान व्हळांत कुठ्ठाळी), श्री हनुमान संगीत सांस्कृतिक संस्थान (नॉनमॉन वास्को), श्री हनुमान मंदिर संस्था (कोणसुआ, कुठ्ठाळी), श्री राम भक्त हनुमान (सडा), राष्ट्रोळी ब्राह्मण संस्थान (वाडे वास्को), श्री शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह साखळी संस्थान (साकवाळ), श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थान (नवेवाडे), श्री संतोषी माता देवस्थान (माउंटा, कुठ्ठाळी), श्री गजानन मंदिर ( मेस्तवाडा बायणा), श्री सत्यनारायण देवस्थान कमिटी (झुआरीनगर), श्री सेवालाल टेम्पल ( सांकवाळ इंडस्ट्रियल झुआरी नगर), श्री विठ्ठल रखुमाई मंदिर (शांतीनगर वास्को), श्री साई भक्त मंडळ संस्थान (सडा), श्री खाप्रेश्र्वर बेलाबाय संस्थान (बेलाबाय) वास्को, श्री ब्रह्मस्थळ संस्थान विठ्ठल रखुमाई मंदिर (पांडुरंग वाडी वास्को), श्री गणपती मंदिर (कट्टा झुआरिनगर), श्री हनुमान मंदिर ( झरीत झुआरीनगर), श्री सद्गुरु समर्थ धुंडेश्वर महाराज ज्ञान योग आश्रम (हेडलँड सडा) आदि मंदिरांना तसेच मंदिरातील पुरोहितांचा श्रीफळ, पुष्प व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक चौगुले, एच पी चे गोमंतक अध्यक्ष संतोष महानंद नाईक, गोमंतक अध्यक्ष एकनाथ नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com