Goa: Truck Accident in Mashe. Daily Gomantak
गोवा

Goa: चाररस्ता ते माशे बगल रस्ता धोकादायक

चाररस्ता ते माशे हा चारपदरी बगल रस्ता (Goa: Mashe Four Lane Bypass Road) सध्‍या अपघात प्रवण मार्ग ठरला आहे. गेल्या आठवडाभरात या रस्त्यावर चार अपघात (Four Accidents) झाले.

Mahesh Karpe

काणकोण : चाररस्ता ते माशे Goa: Mashe Four Lane Highway) हा चारपदरी बगल रस्ता सध्‍या अपघात प्रवण मार्ग ठरला आहे. गेल्या आठवडाभरात या रस्त्यावर चार अपघात झाले. या मार्गाचे काम सदोष असल्‍याचा दावा रहिवासी करीत असून, येथे मोकाट गुरांचाही उपद्रव वाढला आहे. याठिकाणी आवश्‍‍यक ती दुरुस्‍ती करून बॅरिकेड्‍स उभारावेत, अशी मागणी होत आहे.

या मार्गाचे काम सदोष असल्‍याने त्‍याच्‍या बांधणीपासून काणकोणमधील रहिवाशांनी आवाज उठविला होता. या रस्त्याचा बहुतांश भाग शेतजमिनीतून जात आहे, त्यामुळे या भागात सतत गुरांची वर्दळ असते. त्यातच मोकाट गुराची संख्या वाढल्याने या हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स उभारण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत. १९८५ मध्ये या हमरस्त्याच्या उभारणीसाठी जमीन संपादित करण्यात आली होती, मात्र हमरस्त्याचे काम तीन वर्षांपासून सुरू झाले. या बगल मार्गावर तळपण व गालजीबाग नदीवरील पूल उभारण्याचे काम होते. संबंधित कंपनीने पुलासहित या रस्त्याचे काम केले, मात्र या चारपदरी रस्त्याचे काम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्याचे उद्‍घाटन करू नये, अशी येथील काही रहिवाशांची मागणी होती. मात्र, गेल्या वर्षी घाईगडबडीत या चारपदरी रस्त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. रस्त्याची उभारणी करताना चाररस्ता येथील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत कोसळली होती. त्याशिवाय बाबरे खाडीवरील पुलाची संरक्षक भिंतही कोसळली.

चारपदरी रस्त्यावर उंच- सखलपणा आहे, त्यामुळे चालकांना धक्के खात वाहने चालवावी लागतात. याकडे वेळोवेळी येथील रहिवाशांनी कंत्राटदाराचे लक्ष वेधले होते. रस्ता दुभाजक त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला बॅरिकेड्स बसवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वारंवार मोकाट गुरांमुळे अपघात होत आहेत.

हमरस्‍ता अरुंद असल्‍याने गैरसोयीचा

माशे ते चाररस्तापर्यंतचा चारपदरी बगल हमरस्ता वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. या हमरस्त्याची आवश्‍‍यक त्‍या ठिकाणी दुरुस्‍ती करावी, मागणी पैंगीण पंचायतीचे तळपणचे पंच रूद्रेश नमशीकर यांनी केली आहे. चारपदरी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी ही वाहतूक माशे, पैंगीण, खालवडे मार्गे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक ६६ या मार्गावरून होत होती. हा हमरस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होत होते. या रस्त्यावर मोकाट गुरांचाही उपद्रव होता. गेल्या आठवड्यात गालजीबाग येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तीन गुरे दगावली. त्यामुळे या बगल रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स उभारण्याची गरज पंच नमशीकर यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT