Maria Miranda Dainik Gomantak
गोवा

Goa News: मोरपिर्ला शाळेच्या मुख्याध्यापकांना राष्ट्रपतींकडून निमंत्रण; १५ ऑगस्ट स्नेहमेळाव्याचे आमंत्रण

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मोरपिर्ला सरकारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मारिया मिरांडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्नेहमेळाव्याचे आमंत्रण मिळाले आहे. हा त्यांच्यासाठी एक मोठा गौरवाचा क्षण आहे. यापूर्वी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षकदिनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

गेली ३५ वर्षे आदिवासी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विद्यादानाच्या सेवेचा सन्मान म्हणून २०२० मध्ये राज्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानेही मिरांडा यांना गौरविण्यात आले होते. राष्ट्रपतींनी अशोक चिन्हासह खास पाठवलेल्या सोनेरी रंगाच्या मखमली खोक्यातील ही निमंत्रण पत्रिका टपाल खात्याने मिरांडा यांच्यापर्यंत पोहोचवली आहे.

त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी हायस्कूलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिक्षक व विद्यार्थीही सहभागी झाले होते. धन्यवाद देताना त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द नसल्याची भावना मिरांडा यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुरिअरद्वारे गोव्यातून मागवली विदेशी दारु, स्कॉर्पिओमधून पार्सल घ्यायला आले अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भाडेकरु ठेवणाऱ्या गोमन्तकीयांसाठी अतिशय महत्वाची बातमी, Police Verification न केल्यास भरावा लागणार 10 हजार दंड

Pakistan Economic Crisis: एका झटक्यात 1.5 लाख सरकारी नोकऱ्या गेल्या, पाकिस्तानने का घेतला इतका मोठा निर्णय?

Goa Crime: साताऱ्यातील तरुणाने गोव्यातल्या युवतीला घातला 19 लाखांचा गंडा, पोलिसांना आवळल्या मुसक्या

गोव्यात 'कायदा सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत; वाळपई, शिवोलीत 'पडताळणी मोहिम'

SCROLL FOR NEXT