Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मडगावच्या ‘मास्टर प्लॅन’ला काहीच अर्थ नाही : एल्विस गोम्स

Goa Congress: सध्‍या ‘जी-सुडा’तर्फे मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय, त्यास काहीच अर्थ नाही, अशी टीका काँग्रेसचे एल्विस गोम्स यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa Congress: मडगावचा मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी पंचवीसही प्रभागांतील नगरसेवकांवर आहे. सध्‍या ‘जी-सुडा’तर्फे मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय, त्यास काहीच अर्थ नाही, अशी टीका काँग्रेसचे एल्विस गोम्स यांनी केली.

मडगावात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे एल्विस म्‍हणाले की, प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रभागामधील रस्ते, सिवरेज पद्धत, वाहतूक, पाणी व वीजपुरवठ्याची स्‍थिती आदींचा अभ्यास करून त्यात काय त्रुटी आहेत, काय सुधारणा हवी याचा अहवाल बनवून तो सादर करायचा असतो.

सर्वांचे अहवाल एकत्र करून नंतरच मास्टर प्लॅन तयार करावयाचा असतो. येथे तर मास्टर प्लॅन काय हे नगरसेवकांनाच माहीत नाही. रिजनल प्लॅन, झोनिंग प्लॅन, मडगावसाठी ओडीपी असताना मास्टर प्लॅनची गरजच काय? असा सवाल एल्विस गोम्स यांनी उपस्थित केला.

जो मास्टर प्लॅन तयार केलाय असे जे सांगण्यात येते त्यामागे मोठे षडयंत्र आहे. मडगावमधील लोकसंख्या वाढविण्याचा हा डाव आहे. मास्टर प्लॅनबद्दलची माहिती शहरातील सामान्य नागरिकांना कळली पाहिजे.

शहरात कित्येक तज्‍ज्ञ आहेत. त्यांच्याकडून सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत. मास्टर प्लॅन तयार करण्यास ‘जी-सुडा’ कोण? ती केवळ एक संस्था आहे. खरे घटनात्मक अधिकार नगरपालिकेला किंवा पंचायतीला असतात. नगरसेवकांना, पंचांना काहीच महत्व दिले जात नाही. नगरसेवक व पंचांना घटनेत मोठे अधिकार दिले गेले आहेत, असेही एल्विस गोम्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT