21 september 1890|Margao Shootout by portuguese Dainik Gomantak
गोवा

मडगाव ऐतिहासिक घटनेला १३४ वर्षे पूर्ण! शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

Goa News: लोकशाही अधिकार बजावण्याची मागणी करताना गोळीबारात मरण आलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अशा दिवसांचे स्मरण केले पाहिजे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावण्याची मागणी करीत मडगाव येथील होली स्पिरिट चर्चजवळ २१ सप्टेंबर १८९० रोजी जमलेल्यांवर पोर्तुगीज सैन्याने गोळीबार केलेल्‍या घटनेला आज १३४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेची यानिमित्त आठवण काढीत मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांनी या हत्‍याकांडात हौतात्म्य पत्करलेल्या २३ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हा दिवस शासनाने अधिकृतपणे पाळावा तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात या घटनेचा समावेश करणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकशाही अधिकार बजावण्याची मागणी करताना गोळीबारात मरण आलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अशा दिवसांचे स्मरण केले पाहिजे. परंतु, त्याचवेळी लोकशाही अधिकार दडपण्याच्या कृत्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे नायक यांनी आपल्‍या प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले आहे.

गोपनीयतेचा हक्क डावलून, हात वर करून पालिकांचे नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका कायद्यात केलेल्या दुरुस्तीची गोव्यातील नागरिकांना आठवण करून द्यायची आहे. ही दुरुस्ती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या सांगण्यावरून केली होती.

नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी गुप्त मतदान पद्धत असताना दिगंबर कामत पुरस्कृत उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केला होता. त्यानंतर सरकारवर दबाव आणून दिगंबर कामत यांनी पालिका कायदा दुरुस्ती आणली व गुप्त मतदान प्रक्रिया सुरू केली. त्यांची कृती म्हणजे पोर्तुगीज सालाझारशाहीचे प्रतिबिंब आहे, असा आरोप त्‍यांनी केला.

घराच्या भिंतीवर आजही खुणा!

१)मी इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे की २१ सप्टेंबर १८९० रोजी पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या व त्या निवडणुकांमध्ये लोकांना त्यांचा मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता. या निर्णयास विरोध वाढत असताना, पोर्तुगीज प्रशासकाने होली स्पिरिट चर्चजवळ जमलेल्या लोकांवर गोळीबार करण्याचे निर्देश दिले.

२) त्यावेळी झालेल्या गोळीबारात चर्चमधून बाहेर पडलेली एक महिला तसेच एका लहान मुलासह १७ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकूण २३ जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला होता. या गोळीबाराच्या खूणा आजही डॉ. साल्वादोर आल्वारीस यांच्या होली स्पिरीट चर्चजवळील घरावर आहेत, असे नायक यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT