Margao Palika  Dainik Gomantak
गोवा

Margao Garbage Issue: 50 हजारांच्या दंडानंतर आता SGPDA ला नगरपालिकेची दुसरी नोटीस; नोटिशीत उपस्थित केलाय 'हा' प्रश्न

दाजी साळकर : कचरा उचलण्याची जबाबदारी मडगाव पालिकेची

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Municipality : कचऱ्याच्या प्रश्र्नावरून मडगाव नगरपालिका व एसजीपीडीए यांच्यातील शीतयुद्ध आता वेगळ्‍या वळणावर पोचले आहे. किरकोळ मार्केटमधील कचऱ्यावरून नगरपालिकेने एसजीपीडीएला 50 हजार रुपयांचा दंड व नोटीस पाठवल्यानंतर आता दुसरी नोटीस पाठवली आहे.

यावेळी ही नोटीस एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमधील कचऱ्यावरून पाठविण्यात आली आहे.

घाऊक मासळी मार्केटमध्ये जो कचरा गोळा झाला आहे, त्यासाठी एसजीपीडीएला ५० हजार रुपयांचा दंड का ठोठावू नये? असा प्रश्र्न नोटिशीत उपस्थित करण्‍यात आला आहे. या नोटिशीची प्रत घाऊक मासळी मालक संघटनेला पाठविली आहे.

एसजीपीडीएच्या हद्दीतील परिसर दररोज स्वच्छ केला जातो. जे विक्रेते वाहने पार्क करतात, ती जागा नगरपालिकेच्या हद्दीतील आहे. या वाहन चालकांकडूनही पालिका शुल्क गोळा करते.

ज्या वाहनांतून काळ्या रंगाचा द्रवपदार्थ गळत आहे, ती वाहने एसजीपीडीएची नाहीत. पालिकेने एसजीपीडीएऐवजी या वाहनचालकांकून दंड गोळा करावा, अशी सूचना एसजीपीडीएचे अध्यक्ष व वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी केली.

मडगाव व फातोर्डा शहराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यात ती अपयशी ठरत असल्याचा ठपका साळकर यांनी ठेवला.

दोन्ही मार्केटमध्ये जी अस्वच्छता पसरली आहे, ती नगरपालिका वेळोवेळ कचरा गोळा करत नाही म्हणूनच, असा आरोपही त्‍यांनी केला.

काळा द्रवपदार्थ मिसळतोय शेतात, नदीच्‍या पाण्‍यात!

एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटसमोरील रस्त्यावरील वाहनातून काळ्या रंगाचा द्रवपदार्थ पाझरत असून बर्फामुळे तो जवळपासच्या शेतात वाहत आहे. हा काळा द्रवपदार्थ मडगाव-सुरावली रस्त्यावरूनही वाहत आहे.

तसेच साळ नदीच्या पात्रातही मिसळत असल्‍याचे मडगाव नगरपालिकेने एसजीपीडीएला पाठविलेल्‍या नोटिशीत म्हटले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोल व प्लास्टिक आहे.

हा कचरा वेगळा केलेला नाही. एसजीपीडीए मार्केटसमोरील परिसर तात्काळ स्वच्छ करण्यात यावा असेही नोटिशीत म्हटले आहे.

किरकोळ मार्केट परिसरातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी मडगाव नगरपालिकेची आहे. एसजीपीडीएला पालिकेची नोटीस पाठविण्याची कृती घटनाबाह्य आहे. जो कचऱ्याचा ढीग गोळा झाला आहे, तो एसजीपीडीएच्या किरकोळ व घाऊक मासळी मार्केटच्या हद्दीबाहेर आहे. मार्केटबाहेर जे विक्रेते बसतात, त्यांच्याकडून पालिका सोपो शुल्क गोळा करत आहे.

दाजी साळकर, एसजीपीडीएचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT