Goa Monsoon 2023: पावसाची शंभरीकडे वाटचाल, आजही ऑरेंज अलर्ट जारी

चापोली धरण ‘ओव्हरफ्लो’ : शेतकऱ्यांचे नुकसान
Goa Monsoon
Goa MonsoonSandip Desai
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 गेला आठवडाभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागांत पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांसह शेती-बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, काणकोण तालुक्याची तहान भागविणारे चापोली धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. सध्या या जलाशयाची पातळी ३८.८० आरएल आहे, तर १,१२७.२१ हेक्टोमीटर पाणीसाठा आहे.

Goa Monsoon
व्याघ्र प्रकल्प आणि म्हादई अभयारण्यातील लोकवस्तीबाबत आमदार प्रेमेंद्र शेट सभागृहात काय म्हणाले?

गेल्या २४ तासांत ८८.१ मिमी. म्हणजेच ३.४६ इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात एकूण २,४२९.२ मिमी. म्हणजेच ९५.६३ इंच पाऊस पडला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील एक-दोन दिवसांत राज्यात पाऊस इंचांची शंभरी पार करण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

रेल्वे रुळावर येण्यास अजून 3 दिवस

करंझोळ-कॅसलरॉक येथे रेल्वे मार्गावरील दरड काढणे सध्या रेल्वे विभागाच्या आवाक्याबाहेरचे झाले असून संततधार पावसामुळे माती पुन्हा रेल्वे मार्गावर येत आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे यांच्याशी संपर्क साधला असता, मुसळधार पावसामुळे ही दरड हटविण्याच्या कामात वारंवार व्यत्यय येत आहे.

परत परत माती रुळावर येत आहे. आम्ही माती काढण्याचे काम सुरूच ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे वास्को-यशवंतपूर एक्सप्रेस ३० जुलैपर्यंत बंद ठेवली आहे. अन्य गाड्या बेळगावपासून पुढे सुरू ठेवल्या असल्याची माहिती हेगडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com