माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अन् मडगावच्या नगरपरिषदेमध्ये ( Margao municipality ) राजकीय स्थित्यंतरे घडू लागली. यातच मडगावचे नगराध्यक्ष पद घनःश्याम शिरोडकर यांच्याकडे गेल्याने भाजपमध्येच आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. मुख्यमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप केला असला तरीही प्रकरण शपथ घेण्यापर्यंत गेल्याने आज मडगाव नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांनी पदाचा राजीनामा दिला.
(Margaon Municipality Mayor Ghanshyam Shirodkar Resign)
शिरोडकर यांच्याविरोधात 19 सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. चार नगरसेवकांनी नगरपालिका संचालक कार्यालयात हा ठराव दिला. यावर नगराध्यक्ष (Mayor ) घनःश्याम शिरोडकर यांनी पदाचा राजीनामा राजीनामा दिला आहे. 15 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर या ठरावावर चर्चा करण्यासाठी उद्या दिनांक 22 सप्टेंबर रोजी बैठक बोलाविलेली असताना त्याच्या पूर्वसंध्येवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
याबाबत शिरोडकर म्हणाले की, निवडणुकीच्यावेळी मला मतदान केलेल्या नगरसेवकांना मला उद्या धर्मसंकटात टाकायचे नाही. त्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नगराध्यक्ष निवडण्यासाठी गुप्त मतदान झाले आणि यातून अविश्वास ठराव झाल्यास हात दाखवून मतदान करणे ही पद्धत योग्य नाही.
शिरोडकर पुढे बोलताना म्हणाले ही पद्धत बंद करण्यासाठी आपण न्यायालयात जाण्याचा विचारात आहे. उद्या जर या ठरावावर गुप्त मतदान झाले असते तर मला 20 मते पडली असती त्यामूळे इतरांना धर्मसंकटात टाकण्याऐवजी मी हा निर्णय घेतला आहे. आणि मी आज माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.