Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: आता मडगाव-काणकोण टॅक्सीचालकांमध्‍ये संघर्ष, प्रकरण थेट पोलिसांत; एकमेकांची टॅक्‍सी रोखली

goa taxi conflict: काणकोण व मडगाव येथील टॅक्सीचालकांमध्ये प्रवाशांना पिकअप आणि ड्रॉप करण्यावरून काल पुन्हा संघर्ष उफाळला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: काणकोण व मडगाव येथील टॅक्सीचालकांमध्ये प्रवाशांना पिकअप आणि ड्रॉप करण्यावरून काल पुन्हा संघर्ष उफाळला. शेवटी हे प्रकरण फातोर्डा पोलिस स्थानकात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटांना समज दिली. यापूर्वी गोवा माईल्स टॅक्सीचालकांशी स्थानिक टॅक्सीचालक संघर्ष करत होते. आता हा संघर्ष स्थानिक टॅक्सीचालकांमध्येही सुरू झाला आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, मडगावातील मयूर राणे यांच्या मालकीची टॅक्सी काल पाळोळे-काणकोण येथे एका प्रवाशाला आणण्यासाठी गेली होती. ही टॅक्सी ऑनलाईन बुकिंग करण्यात आली होती. जेव्हा ही टॅक्सी प्रवाशाला पिकअप करण्यासाठी पाळोळे भागात पोहोचली, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी रोखली.

तसेच चालकाकडे दमदाटी करून शिवीगाळ केली. या प्रकाराने टॅक्सीचालक घाबरला व तसाच टॅक्सी घेऊन माघारी फिरला. त्यानंतर सदर प्रवाशाला घेऊन काणकोण येथील एक टॅक्सीचालक मडगावात आला. तेव्हा मडगावातील टॅक्सीचालकांनी त्याला अडविले व काणकोणमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्‍यामुळे हे प्रकरण पोलिसांत पोहोचले.

गोवा माईल्स’ टॅक्सीवरून सध्या टॅक्सीचालकांमध्ये नाराजी आहे. ही टॅक्सी प्रवाशाला पिकअप करण्यासाठी आल्याचा समज करून ती काणकोणात अडविण्यात आली. मात्र, आपली टॅक्सी गोवा माईल्सशी संबंधित नाही. जर मडगावच्या टॅक्सी काणकोणमध्ये अडविल्या गेल्या तर आम्ही काणकोणची एकही टॅक्सी मडगावात येऊ देणार नाही. - मयूर राणे, टॅक्‍सीमालक (मडगाव)

संघर्ष सुरू असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून तोडगा काढावा. प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच उपाययोजना केली पाहिजे. आम्‍हीसुद्धा बँकांतून कर्ज काढून टॅक्सी व्यवसाय सुरू केला आहे. आम्हांलाही बँकांचे हप्ते भरावे लागतात. आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा. - सिद्धेश बांदेकर, टॅक्सीचालक (काणकोण)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Blast: "दिल्लीतील स्फोट आम्हीच केला..." पाकिस्तानी नेत्याची जाहीर कबुली Watch Video

Goa Metro: गोव्यात 'मेट्रो सेवा' सुरू करा! केंद्रीय मंत्र्यांची सूचना; हैदराबाद येथील बैठकीत सविस्तर चर्चा

Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

Canacona: युवा पिढीसाठी गोकर्ण पर्तगाळी मठात ॲम्‍फी थिएटर, युवकांना करणार आकर्षित; 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामांची पूर्तता

Baina Vasco Robbery Case: बायणा प्रकरणात दरोडेखोरांना फ्लॅटची इत्थंभूत माहिती कशी? मागच्या वाटेने, लिफ्टने, थेट नायक यांच्‍याच बेडरूमपर्यंत गेलेच कसे?

SCROLL FOR NEXT