Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चोरलेल्या गाड्या झाडीत लपवून ठेवायचा, सराईत दुचाकी चोरट्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी

Bike Theft In Goa: मायणा - कुडतरी पोलिसांनी मुसक्या आवळलेला सराईत दुचाकी चोरटा शहाबुद्दीन शेख (२८) हा दुचाकी चोरून त्या झाडीत ठेवत होता.

Sameer Amunekar

मडगाव: मायणा - कुडतरी पोलिसांनी मुसक्या आवळलेला सराईत दुचाकी चोरटा शहाबुद्दीन शेख (२८) हा दुचाकी चोरून त्या झाडीत ठेवत होता. आपली कुकर्मे उघड होऊ नये यासाठी त्याने ही नामी शक्कल लढविली होती. मात्र, शनिवारी तो पोलिसांच्या तावडीत सापडला व त्याचे पितळ उघडे पडले. तो एकटाच चोरी करीत होता.

आज सोमवारी त्‍याला न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.अन्य दुचाकी चोरी प्रकरणात त्याचा हात असावा, असा पोलिसांना संशय आहे.

सांज जुझे दी आरियल येथील मळार येथे दाटीवाटीने झाडे असून तेथे सहसा कुणी जात नाही. नेमकी हीच जागा हेरून शहाबुद्दीनने चोरलेल्या दोन दुचाक्या तेथे ठेवल्या होत्या.

तो पर्वतवाडा - केपे येथे राहत आहे. हल्ली दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्या असून शहाबुद्दीन याला यापूर्वी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती. पोलिस त्याच्या पाळतीवर होते. शनिवारी रात्री मायणा-कुडतरी पोलिस पाद्रीभाट-नेसाय येथे गस्तीवर असताना त्यांना संशयित दुचाकीवरून जात असताना दिसला.

संशयावरून पोलिसांनी त्याला हटकले. यावेळी तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. मागाहून त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असता, त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. नंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्याने अन्य दुचाकी चोरीचीही कबुली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT