Margao Woman Assaulted Gomantak Digital Team
गोवा

Woman Assaulted in Margao: मथुरा दारू तस्करीचा अड्डा

महिला मारहाण प्रकरण : डॉन सुनील कुमारवर तब्बल २० गुन्हे

सुशांत कुंकळयेकर

Woman Assaulted in Margao: सोमवारी रात्री रेणूका बहादूर हिला केलेल्या अमानुष मारहाणीमुळे स्टेशन रोडवरील वादग्रस्त मथुरा बार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वर पाहता हे बार दिसत असले तरी प्रत्यक्षात रेल्वेतून जी दारूची तस्करी केली जाते, त्या तस्करीचा हा मुख्य अड्डा होता.

त्या बारचा मालक सुनील कुमार या तस्करीतील मुख्य डॉन असल्याची माहिती पुढे आली आहे. मडगाव रेल्वे स्थानकातून जी दारूची तस्करी होते, त्यात सुनील मुख्य सुत्रधार आहे. तस्करीसाठी आणलेल्या दारुचा साठा मथुरा बारमध्ये केला जायचा.

बारच्या मागील बाजूने सरळ रेल्वे स्थानकाच्या तीन व चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाता येते. याच प्लॅटफॉर्मवर सुनीलची माणसे रेल्वेत दारू चढवत.

रेल्वेतील प्रसाधनगृहात ही दारू ठेवून ती गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात पाठविली जात, अशी माहिती समोर आली आहे.

संशयितांना ४ दिवसांची पोलिस कोठडी

रेणूकावर जीवघेणा हल्ला करून तिचे हात पाय मोडून घालण्याचा आरोप असलेल्या सुजीत कुमार सिंग आणि दिलीप कुमार यांना बुधवारी मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीचा रिमांड दिला आहे.

या प्रकरणातील फरार आरोपी सुनिल कुमार सिंग याने अटकपूर्व जामिनासाठी मडगाव सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली.

तस्करीला रेल्वे पोलिसांचे अभय

याच दारूच्या व्यवसायाशी निगडित असलेल्या एका व्यावसायिकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या तस्करीला रेल्वे पोलिसांचेही अभय होते. त्यांच्याच ‘अर्थ’पूर्ण आशीर्वादाने ही तस्करी बिनबोभाट चालू होती.

यासाठी सुनील पोलिसांना दरमहा 60 हजारांचा हप्ता देत असत. मडगाव रेल्वे स्थानक परिसरात जे ड्रग्स विकले जातात, त्यातही त्याचा हात असल्याचे सांगितले जाते.

तस्करीतून एकाची हत्या

दुसरा संशयित सुजित कुमार याचाही दारू तस्करीत सहभाग आहे. याच चोरीच्या वादातून झालेल्या भांडणात त्याच्याकडून मडगाव स्थानकावर हाणामारीत एकाची हत्याही झाली होती.

या प्रकरणात न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. रेणुका हल्ला प्रकरणात सध्या सुजीत कुमार मडगाव पोलिसांच्या ताब्यात आहे.

उत्तर प्रदेशमधून येऊन गुंडगिरी

रेणुका बहादूर हल्ला प्रकरणात सध्या फरार असलेला सुनील कुमार हा मूळ उत्तर प्रदेश येथील आहे. रेल्वेतून मुंबई आणि गुजरातमध्ये दारुची तस्करी होते, त्याचा मुख्य सूत्रधार तो असून त्याच्यावर रेल्वे पोलिसांत वेगवेगळ्या प्रकारचे २० गुन्हे नोंद आहेत. तर मडगाव पोलिसांत मारामारीचे ४ गुन्हे नोंद आहेत.

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करा: आवदा

पोलिसांनी फक्त जबर मारहाणीचा गुन्हा नोंद न करता खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी बायलांचो एकवट या संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी केली आहे. रेणूकावर झालेला हल्ला हा जीवघेणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गोमेकॉ इस्पितळात जाऊन रेणुका हिची भेट घेतली. तिच्या हाताला आणि बोटांना फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT