Gasification Project Dainik Gomantak
गोवा

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Margao waste management project: मडगाव शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील जी. डी. एनव्हायरमेंटल या कंपनीकडून सोनसडो यार्डात दहा टन क्षमतेचा गॅसिफिकेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.

Sameer Amunekar

मडगाव: मडगाव शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील जी. डी. एनव्हायरमेंटल या कंपनीकडून सोनसडो यार्डात दहा टन क्षमतेचा गॅसिफिकेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात गुरुवारी पालिकेच्या नगरसेवकांना आणि अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थित नगरसेवकांनी प्रकल्पाचे स्वागत केले असून पुणे येथे कार्यान्वित असलेल्या कंपनीच्या प्रकल्पाची पाहणी करण्याचे ठरविले आहे.

क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे अशी माहिती पालिका अभियंता दीपक फळदेसाई यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, स्वच्छता समिती अध्यक्ष कामिलो बार्रेटो, पालिका अभियंता फळदेसाई आणि अन्य अधिकाऱ्यांनी पुणे येथील कंपनीकडून चालविल्या जाणाऱ्या १५ टन क्षमतेच्या प्रकल्पाची पाहणी केली.

आता त्या प्रकल्पाची क्षमता २५ टनांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लडाख येथे पाच टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले असून कंपनीकडून एकूण पाच प्रकल्प हाताळण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रात्यक्षिकाच्या वेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्षा बबिता नाईक, नगरसेवक लिंडन पेरेरा, राजू नाईक, सदानंद नाईक, पूजा नाईक काणेकर, लता पेडणेकर, सुनीता पराडकर, जॉनी क्रास्टो, श्वेता लोटलीकर, मुख्याधिकारी मधू नार्वेकर, पालिका अभियंता फळदेसाई, साहाय्यक अभियंता श्रीकांत लवंदे, कनिष्ठ अभियंता सागर नाईक, सज्जन गावकर, अजय देसाई, कंपनीचे संचालक अजित गाडगीळ, मिलिंद गाडगीळ आणि अभिजित दातार उपस्थित होते.

मुख्याधिकारी नार्वेकर नार्वेकर सांगितले की, आपण इंदूर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केलेली आहे. त्यांचे कचरा विल्हेवाटेच्या बाबतीत समर्पित कार्य दिसून येते. त्यामुळे त्या शहराला सलग तीन वर्षे देशातील स्वच्छ शहराचे पारितोषिक मिळाले. आम्ही त्या धर्तीवर काम करण्याची गरज आहे.

सॅनिटरी पॅड्स, डायपर आदी कचरा आम्ही १८ रु. प्रति किलो या दराने उचल करण्यास देत आहोत. अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आतापर्यंत एक कोटी खर्ची घालण्यात आले आहेत. मात्र हा नवीन प्रकल्प उभारण्यात आल्यावर अशा प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट या प्रकल्पात लावली जाईल. त्यामुळे पालिकेचा निधी वाचेल, असे पालिका अभियंता फळदेसाई यांनी सांगितले

प्रकल्प आवश्‍यक : नगराध्यक्ष

नगराध्यक्ष शिरोडकर नगराध्यक्ष यांनी या कचरा प्रक्रिया प्रकल्पात मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य आहे, याकडे लक्ष वेधले. आम्ही नियुक्त केलेल्या कचरा गोळा एजन्सी कचरा वर्गीकरण करत असल्याने त्यावर प्रक्रिया करणे आणखी सुलभ होईल, असे त्यांनी नजरेस आणून दिले.

यापूर्वी सोनसड्यावर उभारलेले प्रकल्प निकामी झाल्याचे डोक्यातून काढून टाकणे आवश्यक असून नव्याने सुरुवात करून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT