Goa Margao Traffic Problem Dainik Gomantak
गोवा

Margao News: 'सिटी बसचालकांवर' कारवाई कधी होणार? मडगावात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

Margao Traffic Issue: काही ठिकाणी पोलिस तैनात केलेले असतात; पण ते त्यांच्या विरोधात काहीच कारवाई करीत नाहीत. केवळ शिट्या वाजवून त्यांना तिथून जायला सांगतात. शिवाय सिटी बसचालकांना कित्येकदा ताकीद देऊनही ते ऐकत नसल्याचे दिसून येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Margao City Bus Driver's Disturbance On Road Causes Traffic Jam

सासष्टी: मडगाव शहरात वाहनांची संख्या वाढलेली असून प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असताना दिसत आहे. याला बेकायदेशीर पार्किंग, बेदरकार वाहने हाकणे ही व अन्य कारणे असली तरी सिटी बासचालकांची मस्तीही वाहतूक कोंडीला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या सिटी बासचालकांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्‍न सामन्य नागरिक विचारीत आहेत.

मडगाव कदंब बसस्थानकावरून बस सुटल्यावर हळू हळू चालक बस हाकत असतात, त्यामुळे इतर वाहनांना अडथळा होतो. या बसेस कोलवा सर्कल, होली स्पिरीट चर्चनंतर हॉस्पिसियो येथे थांबतात, नंतर बीपीएस क्लब, पाजीफोंड येथील चार रस्त्यावर, नंतर आके रस्त्यावर दोन-तीनकडे तरी थांबे नसतानाही थांबतात.

त्यानंतर पांडवा कपेल, पॉवर हाउस येथे थांबा घेतात. मध्येच थांबून प्रवाशांना उतरवतात व नवीन प्रवाशांना घेतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. मडगावकडे येताना पांडव कपेलनंतर न्यू ईरा हायस्कूल, आमदार दिगंबर कामत यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या क्रॉसिंगवर, नंतर रॉयल फूड्स, कारो कॉर्नर येथे थांबतात व त्यांच्या बस हाकण्याच्या संथगतीमुळे इतर वाहनचालकांना पुढे जाणे कठीण होत असते.

पोलिसत्यांच्या विरोधात काहीच कारवाई करीत नाहीत. केवळ शिट्या वाजवून त्यांना तिथून जायला सांगतात. शिवाय सिटी बसचालकांना कित्येकदा ताकीद देऊनही ते ऐकत नसल्याचे दिसून येत आहे.

ताकीद देऊनही परिणाम शून्यच!

दीड महिन्यापूर्वी साहाय्यक वाहतूक संचालक निक्सन सुवारीस यांनी या सिटी बसचालकांना ताकीद दिली होती. हल्लीच वाहतूक खात्याचे अधिकारी व पोलिस अधिकारी संजय दळवी यांनी आके भागात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता.

आके भागात वाहतूक कोंडी सकाळी तसेच सायंकाळी होत असते. तसेच रेल्वेतून येणारे प्रवासी आके पांडवा कपेलसमोर येऊन बसची वाट पाहतात, त्यामुळे त्या परिसरात गर्दी वाढत असते, असे लोकांचे म्हणणे आहे. काही बसेस कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या मडगाव बाजूने थांबतात त्यामुळे तेथे वाहनांची लांब रांग लागलेली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT