जखमी विद्यार्थ्याची आई रुतिका गावकर. Dainik Gomantak
गोवा

Margao: विद्यार्थ्याला दंडुक्याने जबर मारहाण; आता अटकपूर्व जामिनासाठी शिक्षकाची कोर्टात धाव

जखमी विद्यार्थ्याचा पोलिसांनी जबाब घेतला; शिक्षकाला अटक करण्‍याची पालकांची मागणी

सुशांत कुंकळयेकर

Margao News: आमोणे-काणकोण येथील बलराम निवासी शाळेतील सहावीचा विद्यार्थी रुपेश रत्‍नाकर गावकर याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्‍या संशयित शिक्षक प्रसाद पागी यांनी अटकेच्‍या भीतीने मडगावच्‍या दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

या प्रकरणी काणकोण पोलिसांनी उद्या, 5 ऑक्टोबर रोजी आपले म्‍हणणे न्‍यायालयाला सादर करावे, अशी नोटीस न्‍यायालयाने जारी केली आहे.

दरम्‍यान या शिक्षकाला अटक करा अशी मागणी त्‍या मुलाची आई रुतिका गावकर यांनी केली आहे. याप्रकरणी दाखल केलेली तक्रार मागे घ्‍यावी यासाठी शाळेतील काही शिक्षकांकडून आपल्‍यावर दबाव येत आहे. शिक्षक प्रसाद पागी हे मंगळवारी रूग्णालयात आले होते.

त्‍यांनी मला केस मागे घेण्‍यासाठी पैशांचे आमिष दाखविले. माझ्या मुलाला ज्‍या अमानुषपणे मारहाण झाली आहे ती पाहता त्याला अटक अटक झालीच पाहिजे, अशी मागणी त्‍यांनी केली.

ही शाळा गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन शिक्षकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास भगत यांनी केली आहे. तारा केरकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

2 ऑक्‍टोबर रोजीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कधी जायचे अशी विचारणा रुपेश गावकर या विद्यार्थ्याने एका शिक्षिकेकडे केली होती. त्यावरून शिक्षक प्रसाद पागी याने त्‍याला दंडुक्‍याने जबर मारहाण केली.

त्यात रूपेश याचे हात-पाय सुजले. त्याच्यावर सध्या मडगावच्‍या दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT