stray dog Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगावात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली

मडगाव नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगावातील भटकी कुत्री व त्यातून तयार होणा-या समस्या यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दुसरीकडे ही समस्या हाताळणा-या बिगर सरकारी संघटनेकडील समझोत्याची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली तरी पुढील पावले न उचलल्याने ही समस्या बिकट बनली आहे.

(Margao stray dog problem increased)

मडगाव नगरपालिकेने श्वान जनन प्रमाणावर निर्बंध आणण्यासाठी सोनसोडोवरील पशुरुग्णालयातच सर्व व्यवस्था केली होती. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून या केंदात ठेवून तेथे त्यांच्यावर नसबंदी केली जात होती व काही वर्षे त्याचे अनुकुल परिणाम दिसून भटक्या कुत्र्यांची संख्याही घटली होती.

पण नंतर नगरपालिकेकडून या संघटनेला बिले चुकती करण्यात हयगय झाली. नंतर कोविड काळात सर्व व्यवहार ठप्प झाले व त्याचा परिणामही या कार्यक्रमावर झाला. सदर संघटनेचा कामाची.मुदत सपली तरी तिचे काम चालूज आहे. मडगाव पालिकेने या कामासाठी नव्याने प्रस्तावही मागविलेले आहेत व त्यामुळे आता नव्या नगराध्यक्षांच्या कार्यकाळात ते मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.

बालक, शाळकरी मुलांना सर्वाधिक धोका

मडगाव नगरपालिका परिसरात वाढत असलेला भटक्या कूत्र्यांचा वावर यांचा सर्वाधिक धोका बालक, शाळकरी मुलांना आहे. कारण घरातून बाहेर आल्यानंतर कधी कधी पालंकांच्या काहीवेळा लक्ष नसते. अशावेळी भटक्या कूत्र्यांनी हल्ला केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. तसेच शाळकरी मुलं ही रस्त्यावरुन येता जाताना मोकाट कूत्र्यांचा हल्ला होऊ शकतो. त्यामूळे पालिकेने वेळीच याच लक्ष घालून यासमस्येतून नारिकांची सुटका करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT