Margao police Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: मुंबईच्या अट्टल गुन्हेगाराच्या गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मडगाव पोलीस आणि कांदिवली, मुंबई पोलिसांनी केली संयुक्त कारवाई

दैनिक गोमन्तक

घरफोडीसह इतर सुमारे 13 लुटमारीच्या गुन्ह्यात समावेश असलेल्या रिझवान अन्वर शेख या अट्टल गुन्हेगारास मंगळवारी (दि.23) अटक करण्यात आली. मडगाव पोलिस आणि कांदिवली, मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. आरोपी रिझवान अन्वर शेख याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. मुंबई पोलिस त्याच्या मागावर होते, शेख सातत्याने पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी व्हायचा. पण, मंगळवारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

(Margao police and Mumbai Kandivali Police in joint operation arrested a man wanted in nearly 13 cases of dacoity and robbery )

संशयित रिझवान अन्वर शेख याला यापुर्वीच 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. परंतु अनेक वेळा त्याच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे. रिझवानवर गुन्हेगारी संबंधातील 7 अतिरिक्त खटले दाखल करण्यात आले आहेत. त्या खटल्यांना या गुन्हेगारास आता सामोरे जावे लागणार आहे.

न्यायालयात हजर करत दिले मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मडगाव पोलिसांनी मुंबई कांदिवली पोलिसांसह रिजवान अन्वर शेख या वॉन्टेड गुन्हेगाराला दरोडा आणि दरोड्यात सहभागी असल्याच्या कारणावरुन शोध सुरु होता. हा शोध आता संपला आहे. शेख याला अटक केल्यानंतर ट्रान्झिट वॉरंट घेऊन आरोपीला न्यायालयात हजर केले व मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT