Margao Goa Old Buildings Dainik Gomantak
गोवा

Goa News: इमारतीची दुरुस्ती सरकारमार्फतच; मडगाववासियांना बांधकाममंत्र्यांचे आश्वासन

मडगावच्या कोमुनिदाद इमारतीची दुरुस्ती सरकारमार्फतच केली जाईल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी कोमुनिदाद सदस्यांना दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: मडगावच्या कोमुनिदाद इमारतीची दुरुस्ती सरकारमार्फतच केली जाईल. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर इमारत कोमुनिदादच्या स्वाधीन केली जाईल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी कोमुनिदाद सदस्यांना दिले आहे.

प्रजासत्ताकदिनी मडगावात झेंडावंदनासाठी आल्यावेळी मंत्री व कोमुनिदाद सदस्यांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी मंत्र्यांनी वरील पर्याय सुचविला. शिवाय दुरुस्ती कशी व कुठे करावी, हा निर्णय कोमुनिदाद सदस्यांना घ्यायचा आहे, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्यासाठी मंत्र्यांसह सदस्यांनी इमारतीची पाहणी करावी, सर्वेक्षण करावे व खर्चाचे अंदाजपत्रक ठरवावे, असे चर्चेच्या वेळी ठरले. सार्वजनिक बांधकाम खात्याने इमारतीच्या दुरुस्तीसाठी 2.83 कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. पाहणी केल्यानंतर त्यात कमी जास्त फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोमुनिदाद सदस्यांना भीती होती की, दुरुस्त केल्यावर सरकार इमारत आपल्या ताब्यात घेईल. पण मंत्र्यांनी सरकारचा तसा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले.

दुरुस्ती खर्चासाठी त्यांचा कितीचा वाटा असेल हे कोमुनिदाद फोरमने ठरवावे, असा पर्यायही मंत्र्यांनी दिला आहे. एकदा का खर्चाचे अंदाजपत्रक तयार झाले की सरकार निविदा काढणार असल्याचे मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांबरोबरची चर्चा फलदायी ठरली. यावेळी इमारतीचा ढासळत्या डोलाऱ्यासंदर्भातील माहिती मंत्र्यांना दिली व पुढे काय करावे याबद्दल चर्चा केली. जरी सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्ती केली तरी इमारतीचा मालकी हक्क कोमुनिदादकडेच राहणार, असे मंत्र्यांनी आश्र्वासन दिले आहे. - फ्रॅंकी मोंतेरो, अध्यक्ष, कोमुनिदाद फोरम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT