Rohan khaunte
Rohan khaunteDainik Gomantak

Rohan khaunte: 'पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती'

आपले राज्य आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हापसा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात केले.
Published on

PM Narendra Modi: भारतात सर्वात मोठी लोकशाही आहे. आपण सर्वात तरुण राष्ट्रदेखील आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने गेल्या आठ वर्षांत मोठी प्रगती केली आहे.

आपले राज्य आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन पर्यटन, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी म्हापसा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाला कळंगुटचे आमदार मायकल लोबो, अपर जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, यशस्विनी बी., मामलेदार दशरथ गावस, साहाय्यक मामलेदार, शासकीय अधिकारी व स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Rohan khaunte
Goa News: विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करणार -मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध धोरणे, कार्यक्रम आणि विकास प्रकल्प सुरू केले आहेत.

अनेक आव्हानांना तोंड देत सरकारने जलमार्ग, रस्ते, महामार्ग आणि हवाई मार्ग या चारही क्षेत्रांत विकास केला आहे. नवा झुआरी पूल केवळ राज्यातील दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा नाही तर त्यातून गुंतवणूकदारांना संदेश दिला आहे, असे खंवटे म्हणाले.

Rohan khaunte
Goa News: सुर्ल-कुडचडे संतोषी मातेचा मूर्तिप्रतिष्ठापना वर्धापनदिन

एकात्मिक बीच व्यवस्थापन धोरणाचा वापर

सरकारला नोकऱ्या निर्माण करण्याच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात लवकरात लवकर सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. येत्या काही दिवसांत, एकात्मिक बीच व्यवस्थापन धोरणाद्वारे बहुतांश किनारे स्वच्छ केले जातील, असे खंवटे म्हणाले.

गोव्यात 165 स्टार्ट-अप्स सुरू

गोव्याला जगातील टॉप 25 आशियाई स्टार्ट-अप्समध्ये स्थान मिळेल. गोव्यात आम्ही 3 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह अंदाजे 165 स्टार्ट-अप्स सुरू केले आहेत. आयटी क्षेत्रातील ऑनलाइन सेवांचा फायदा 219 गोमंतकीयांना झाला आहे.

पुढील 8 दिवसांत गोव्यातील लोक तालुका स्तरावरील सर्व 175 सेवांचा लाभ घेऊ शकतील. ज्यात सध्याच्या नागरिक सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती खंवटे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com