Ghanshyam Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: माझ्यावर अविश्वास ठराव का आणणार ? ते मडगावकरांना त्यांनी सांगावे

घनःश्याम शिरोडकर: नगरसेवकांच्या हाती नारळ ठेवून शपथ देणे चुकीचे

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिका नगराध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात सोमवारी भाजपचे 15 नगरसेवक अविश्वास ठराव आणू पहात असल्याच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिरोडकर म्हणाले की, आपल्या विरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. तर तो कोणत्या कारणासाठी आणला जाणार आहे हे मडगावकरांना त्यांनी सांगावे लागेल अशी प्रतिक्रीया शिरोडकर यांनी दिली आहे.

(Margao Municipality Mayor Ghanshyam Shirodkar face goa BJP to no-confidence motion against)

नगराध्यक्ष पदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी आज दुसऱ्याच दिवशी सोनसोडो प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अविश्वास प्रस्तावासंदर्भात विचारले असता, माझ्याही कानावर ती गोष्ट आली आहे. पण हा प्रस्ताव कोणत्या कारणासाठी हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. मी जर माझ्या कामात अयशस्वी ठरलो असतो तर गोष्ट वेगळी असती. येथे तर मी अजून कामही सुरू केलेले नाही. तरीही अविश्वास प्रस्ताव आणणार ? असा सवाल त्यांनी केला.

मी या पदावर काही गौडबंगाल करून जिंकून आलेलो नाही. 15 नगरसेवकांनी मला मतदान करून निवडून आणले आहे. नगरपालिका राजकारणात पक्षीय राजकारणाला थारा नाही. माझ्या कामावर नगरसेवकांचा विश्वास आहे. म्हणून त्यांनी मला निवडून दिले आहे.

मडगावच्या नागरिकांच्याही माझ्याकडून अपेक्षा आहेत असे ते म्हणाले. मला मतदान केलेल्या नगरसेवकांना मंदिरात नेऊन त्यांना नारळावर हात ठेऊन शपथ घ्यायला लावणे हे चुकीचे आहे. शेवटी देव माझ्या बरोबरच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोनसोडो 100 दिवसात स्वच्छ करू

सोनसोडो समस्या जागेवर घालणे हेच माझे उद्दिष्ट असून मला 100 दिवस द्या. ही समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन देतो असे ते म्हणाले. सोनसोडोवरील कामाला गती यावी यासाठी दररोज सायंकाळी आपण या जागी उपस्थित राहणार असे सांगून इतर नगरसेवकांनीही ही समस्या सोडविण्यासाठी वेळ द्यावा असे त्यांनी आवाहन केले. ही समस्या सोडविणे ही माझी एकट्याची जबाबदारी नाही ती सर्वांची असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आपल्याला हवे असे ते म्हणाले.

विजय सरदेसाई यांनी यासाठी आपले पूर्ण सहकार्य देण्याची तयारी दाखविली आहे. असे त्यांनी सांगितले. सोनसोडो समस्या जागेवर पडल्यानंतर आपण मडगाव शहरातील सुधारणांना हात घालू. त्यासाठी आमदारांनीही मला सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT