Margao Municipality News Dainik Gomantak
गोवा

फूड स्ट्रीटचे पाच टक्के बांधकाम पाडा! पालिकेला नोटीस; अन्यथा अवमान याचिका दाखल करणार

Margao illegal construction notice: न्यायालयाच्या आदेशानुसार त्या स्टॉलच्या क्षेत्रफळापैकी ५३ चौरस मीटर भाग न हटवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नझीर खान यांनी कायदेशीर नोटिस पाठविली

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को, ता. १४ (खास प्रतिनिधी): मुरगाव पालिकेच्या बालोद्यान परिसरात उभारलेले स्ट्रीट फूड स्टॉल्स सुरू करण्यासंबंधी संबंधितांनी हालचाली सुरू केल्या होत्या.

परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार त्या स्टॉलच्या क्षेत्रफळापैकी ५३ चौरस मीटर भाग न हटवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नझीर खान यांनी कायदेशीर नोटिस पाठविली आहे. त्यामुळे काम बंद करण्यात आले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचे नझीर खान यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पालिकेने फूड स्ट्रीट बालोद्यानालगतच्या जागेत उभारण्याचा निर्णय घेतला होता. या जागेत स्थानिक युवक किक्रेट तसेच इतर खेळ खेळतात, त्यामुळे तेथे फूड स्ट्रीट उभारू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते नझीर खान न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सात दिवसांची मुदत

न्यायालयाच्या आदेशानुसार त्या स्टॉल्सच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५३ चौरस मीटर भागाचे बांधकाम सात दिवसांत मोडा अन्यथा संबंधितांविरोधात न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पुढील कोणती पावले उचलतात याकडे वास्कोवासियांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

Khelo India Beach Games 2026: गोव्याची कामगिरी सुधारली, खेलो इंडिया बीच गेम्समध्ये एका सुवर्णासह चार पदके

Goa Winter Session 2026: अंधार दूर होणार, प्रकाश येणार! वीज जोडणीसाठी लवकरच नवा अध्यादेश, हायकोर्टाच्या बंदीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

Goa Winter Session 2026: चिंबल ग्रामस्थांची विधानसभेवर धडक, 'युनिटी मॉल' रद्द करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम; सभागृहात विरोधकांचा आक्रमक अवतार! VIDEO

SCROLL FOR NEXT