मडगाव: फक्त मडगाव पालिकेवर नियंत्रण मिळविण्यासाठी वटहुकूम आणणे ही लोकशाही विरोधी आणि लाजिरवाणी गोष्ट असून सरकारने हा वटहुकूम लागू न करता तो मागे घ्यावा अशी मागणी शॅडो कौन्सिलचे सावीयो कुतिन्हो यांनी केली आहे.
( Margao municipality Coutinho Savio alleged digambar kamat)
हा वटहुकूम म्हणजे संविधानाने स्थानिक नगर संस्थांना 73 व 74 व्या दुरुस्तीखाली दिलेल्या अधिकारांची पायमल्ली आहे. ज्या आमदाराने आपल्या स्वार्थासाठी देवाची शपथ मोडली, त्यांनीच आता पालिकेवर वाममार्गाने नियंत्रण मिळविण्यासाठी हा वटहुकूम आणला. ही निषेधार्ह बाब आहे. या वटहुकूमाचा विपरीत परिणाम फक्त मडगाव पालिकेवर होणार नाही तर राज्यातील सर्व पालिकावर होणार आहे हे लक्षात घेऊन तो त्वरित रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.