Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावात कर वाढणार! पालिका बैठकीत चर्चा; दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

Margao Municipal Council: शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात खास बैठक झाली. मुख्याधिकारी मानुएल वाझ, उपनगराध्यक्ष बबिता नाईक व अन्य नगरसेवक यावेळी हजर होते.

Sameer Panditrao

Margao Municipal Council Tax News

मडगाव: मडगाव पालिकेने आता आपल्या विविध करांत वाढ करण्याचे ठरविले आहे. गुरुवारी त्यानिमित्त पालिकेने खास बैठक बोलाविली होती. यात या विषयावर चर्चा झाली. विविध करांत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

पालिका क्षेत्रातील बांधकामांचे दर हे राज्य सरकारकडून ज्याप्रमाणे अधिसूचित करण्यात आलेल्या दरानुसार याआधीच वाढवण्यात आलेले आहे. घरपट्टी, व्यापार परवाना, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर कर हे मागील दहा वर्षांपासून वाढविलेले नव्हते. त्यात आता मोठी वाढ न करता केवळ दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ केल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात खास बैठक झाली. मुख्याधिकारी मानुएल वाझ, उपनगराध्यक्ष बबिता नाईक व अन्य नगरसेवक यावेळी हजर होते.

बैठकीनंतर नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले की, मडगाव पालिका ही अ दर्जाची पालिका आहे. त्यामुळे या पालिका क्षेत्रातील दर हे इतर पालिका क्षेत्रापेक्षा जास्त असू शकतात. कायद्यानुसार दरवर्षी कराच्या रकमेत दहा टक्के वाढ करण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला असतो. पण अनेक वर्षे कराच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नव्हती. आता हा विषय हाती घेत कराच्या रकमेत आवश्यक त्या ठिकाणी १० ते १५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आस्थापन हस्तांतरण करातही वाढ

आस्थापन हस्तांतरण कराच्या रकमेत एक हजारांची वाढ तर रक्ताच्या नात्यात नसल्यास ही रक्कम पाच हजार करण्यात आली. व्यावसायिक आस्थापनांच्या कराच्या रकमेत एक हजारांची वाढ करण्यात आलेली आहे.

दहा वर्षे कराच्या रकमेत वाढ केलेली नाही पण तरीही पन्नास ते शंभर टक्के वाढ न करता वीस टक्क्यांपर्यंत वाढ केलेली असल्याचे सांगितले.

घरपट्टी, व्यापार परवाना, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदींवरील कर वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे पालिकेच्या महसूल वाढण्यास मतद होणार आहे.

...तर घरपट्टीवर १२ टक्के व्याजदर

घरपट्टी वर्षभराची न भरल्यास इतर पालिका वर्षभराच्या रक्कमेवर १२ टक्के व्याजदर लावून ती रक्कम अदा करतात. ही पध्दत अद्यापही मडगाव पालिका प्रशासनाकडून अवलंबण्यात आलेली नव्हती. जे भरतात त्यांच्या घरपट्टीत वाढ न करता जे आर्थिक वर्षात घरपट्टी अदा करत नाहीत, त्यांना १२ टक्के व्याजदर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT